Header Ads Widget


प्रा.डॉ.पुष्कर शास्त्री लिखित जन जसवंत ग्रंथांच्या प्रकाशन सोहळा पुणे येथील भारत इतिहास संशोधन मंडळ सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित..


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे:शहादा येथील प्रा.डॉ.पुष्कर शास्त्री लिखित जन जसवंत ग्रंथांच्या प्रकाशन सोहळा येत्या १ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील भारत इतिहास संशोधन मंडळ सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केलेला आहे.

ग्रंथाचे प्रकाशन डॉ.गो.ब.देगलूरकर माझी कुलपती डेक्कन कॉलेज पुणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहादा येथील ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील भागवताचार्य रमेश शास्त्री सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्राध्यापक डॉक्टर पुष्कर शास्त्री हे कै.विश्राम पाटील शैक्षणिक संकुलात सेवेत आहेत.त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत.वेगवेगळी ऐतिहासिक संशोधनात देखील त्यांनी लिखाण केलेले आहे.इतिहासाबाबत गाढा त्यांच्या अभ्यास आहे.कार्यक्रमाला उपस्थितीचे आव्हान ग्रंथ लेखक प्राध्यापक डॉक्टर पुष्कर शास्त्री यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|