Header Ads Widget


शहादा शहरातील हितेश पटेल यांनी शिरपूर रस्त्यावरील श्रीकृष्ण गौ शाळेला एक ट्रॉली चारा दान म्हणून दिले...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:राज्यात भीषण पाणीटंचाई सोबत गुरांसाठी चारा टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे.इतर जिल्ह्यातून चारा खरेदी करण्यासाठी शहादा तालुक्यात शेतकरी दिसत आहेत.दरम्यान गुरांना चारा मिळावा म्हणून शहादा शहरातील हितेश पटेल यांनी शिरपूर रस्त्यावरील श्रीकृष्ण गौ शाळेला एक ट्रॉली चारा दान म्हणून दिल्याने कौतुक केले जात आहे.

शहादा तालुक्यात तीन ते चार गौशाळा आहेत.या गौशाळांना सातत्याने अखिल भारतीय भक्ती परिवारातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गोळा झालेल्या निधीतून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करून दिला आहे.त्याच्या आदर्श घेऊन हितेश पटेल यांनी एक ट्रॉली चारा उपलब्ध करून दिला आहे.

त्यांनी स्वतः गौशाळेला जाऊन चारा दान केला.यावेळी त्यांचे सोबत त्याचे सहकारी मनीष मुंडिया होते.विविध सेवाभावी संस्था संघटना तसेच दानशूर व्यक्तींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी गौशाळांमध्ये चारा उपलब्ध करून द्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments

|