Header Ads Widget


शारदा कन्या माध्यमिक विद्यालयातील किमया युवराज राठोड हिने माध्यमिक शालांत परीक्षेत ९६.६० टक्के गुण मिळवून शहादा तालुक्यात प्रथम


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:शहादा येथील सातपुडा शिक्षण संस्था संचलित शारदा कन्या माध्यमिक विद्यालयातील किमया युवराज राठोड हिने माध्यमिक शालांत परीक्षेत ९६.६० टक्के गुण मिळवून शहादा तालुक्यात प्रथम आली आहे. शाळेच्या एकूण निकाल ९३.४४ टक्के लागला आहे.

विद्यालयात कस्तुरी नंदलाल निझरे ९३.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर संस्कृती संजय देशमुख हिने ९०.६० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.तालुक्यात प्रथम आलेली किमया राठोड व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव तसेच पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

शहादा येथीलच सातपुडा शिक्षण संस्था संचलित वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाच्या दहावी शाळेच्या निकाल एकूण ९१.३० टक्के लागला असून विद्यालयात तन्मय दीपक गुरव ९०.४० टक्के गुण प्रथम प्रणय रवींद्र गिरासे ८९.६० टक्के गुण द्वितीय तर भावेश प्रवीण कुमार वानखेडे ८९.२० टक्के गुण मिळवून तृतीयाला आहे.

शहादा शहरात ३ व ग्रामीण भागात ६ असे एकूण ९ माध्यमिक शालांत परीक्षेचे केंद्र होते.ग्रामीण भागात लोणखेडा म्हसावद पुरुषोत्तम नगर मंदाने वडाळी व बामखेडा येथे होते.

Post a Comment

0 Comments

|