Header Ads Widget


धुळे जिल्हयातुन सराईत पाच गुन्हेगारांना केले दोन वर्षाकरीता हद्दपार;साक्री पोलिसांच्या प्रयत्नांना यश...


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: साक्री पोलीस स्टेशन हद्यीतील चोरी व मालाविरूध्दचे गुन्हे करणारे तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांना जिल्हयातुन हद्दपार करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.श्रीकांत धिवरे, धुळे यांनी मोहीम हाती घेतली होती.साक्री पोलीस स्टेशनला मागील एक दोन वर्षात मालाविरूध्दचे व शरिराविरूध्दचे गुन्हे करणा-या टोळींना तसेच सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने साक्री शहरात शांतता रहावी टवाळखोर इसमांकडुन व सराईत गुन्हेगारांकडुन सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नमुद गुन्हेगारांना धुळे जिल्हयातुन हद्दपार करण्यासाठी साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी प्रस्ताव तयार करून मा.पोलीस अधिक्षक यांचेकडेस पाठविलेले आहेत. त्यापैकी मा.पोलीस अधिक्षक ,धुळे यांनी हद्दपार प्रस्तावाची चौकशी करून त्यांचेकडील क्र.०१/२०२३/कापुस गैग/हद्यपार आदेश/२३३९/२०२४ धुळे, दिनांक ०२/०५/२०२४ अन्वये मधील आरोपी नामे १) प्रमोद सुकदेव शिवदे रा.कावठे ता. साक्री, जि.धुळे २) दिलीप किशोर भिल रा.कोकले, ता. साक्री, जि. धुळे ३) सुरेश रामलाल माळीच रा.कोकले, ता.साक्री,जि.धुळे ४) जगदीश राजु माळचे रा. कावठे, ता.साक्री, जि. धुळे ५) सुनिल बापु मरसाळे रा. कावठे, ता. साक्री अशांना धुळे जिल्हयातुन दोन वर्षा करीता हद्यपार करण्याबाबत अंतिम आदेश पारीत केले आहेत. सदर हद्दपार इसमांपैकी अ.नं. १ ते ४ यांना डिटेन करून ताब्यात घेण्यात आले असुन त्यांना त्यांच्या नातेवाईकांना समज देण्यात आलेली आहे. तसेच सदर इसमांना धुळे जिल्हयाचे बाहेर सोडण्यासाठी योग्य ती कारवाई करीत आहेत. तसेच अ.नं.५) सुनिल बापु मरसाळे रा.कावठे, ता. साक्री हा सध्या फरार असुन साक्री पोलीस त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई करीत आहेत.सदरची हद्दपार प्रस्तावाची कारवाई मा.श्री.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक सो.धुळे, मा.श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक सो.धुळे, मा.श्री. साजन सोनवणे, उप विभागीय पोलीस अधिकारी, साक्री विभाग साक्री सो. यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. हर्षवर्धन गवळी, पोसई. प्रसाद रौदळ, पोहेकॉ १२६० उमेश चव्हाण, पोहेकॉ ७१० संजय शिरसाठ, पोहेकॉ / १४८१ शांतीलाल पाटील, पोहेकॉ ७११ बापु रायते, पोहेकॉ/९७२ दिलीप कांबळे, पोकॉ/१६६७ रोहन वाघ यांच्या पथकाने केलेली आहे.

Post a Comment

0 Comments

|