Header Ads Widget


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 10 तारखेला नंदुरबार दौरा निमीत्ताने शहादा भाजपा कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न...

शहादा प्रतिनीधी /जुनैद अहेमद: पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 तारखेला भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार हीनाताई गावीत यांच्या प्रचारासाठी नंदुरबार येथे येत आहेत . म्हणून आज दिनांक 4 मे रोजी शहादा भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत घराघरात अक्षता देऊन निमंत्रण देणे, कॉर्नर सभा घेणे, मोदींचा नमस्कार, मोदींचा परीवार, स्टिकर लावणे, मोदींच्या सभेसाठी बूथस्तरावर नियोजन करणे याविषयी पदाधीकऱ्यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी कर्नाटक राज्याचे मा. मंत्री भाजपा सह प्रभारी श्री. निर्मल कुमार सुराणा, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, आ. राजेश पाडवी,नूह भाई नुरानी,अजय भोळे, मकरंद भाई पटेल, कैलास चौधरी, बळीराम पाडवी, जितेंद्र जमदाडे, गौरव वाणी, नितीन पाटील, शैलेंद्र आजगे, मयूर पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|