साक्री प्रतिनिधी/अकिल शहा : दि.०५/०५/२०२४ रोजी साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. हर्षवर्धन गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दहिवेल गाव शिवारातील कान नदीपात्रात एक इसम गावटी हातभट्टी लावुन दारु पाडण्याचे काम करतो अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी साक्री पोलीस स्टेशनचे नेमणुकीचे पोसई संदीप मुरकुटे, पोसई प्रसाद रौदळ, असई राजु जाधव, असई रामलाल अहिरे व पोकॉ / १४८३ दिनेश मावची अशांना सदर ठिकाणी पाठवुन बातमीचे अनुषंगाने खात्री केली असता दहिवेल गावातील दहिवेल पिंपळनेर रोडवरील कान नदीच्या पुलावरुन नदीपात्रातुन सुमारे उत्तरेस एक किमी अंतरावर एक गावठी हातभट्टी लावलेली दिसुन आली. त्याशेजारीच एक इसम दारु पाडत असल्याचे दिसुन आले तेव्हा नमुद पथकाने त्या इसमास थांबण्यास सांगितले असता सदर इसम तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव छोटु बुधा सोनवणे, (वय ३५)रा. दहिवेल, ता. साक्री. जि.धुळे सांगितले. त्यानंतर सदर हातभट्ट्यांवर नमुद पथकाने जागीच छापा टाकला असता सदर छाप्यामध्ये एकुण १५,५००/- रुपये किमतीचे गावटी हातभट्टीचे दारु बनविण्याचे रसायन व साधन साहित्यासह तयार झालेली गावठी हातभट्टीची दारु व कच्चे रसायन मिळुन आले. सदर मिळुन आलेली गावठी दारु पंचासमक्ष पोलीसांनी जागीच नष्ट केली आहे. वरील बाबत गावटी हातभट्टीचे रसायन बनवून त्याची बेकायदेशीरपणे दारु पाडणाऱ्या छोटु बुधा सोनवणे, रा.दहिवेल याचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमचे कलम ६५ (फ) वगैरे प्रमाणे साक्री पोलीस स्टेशन अभिलेखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे सो. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे मो. मा उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री श्री. साजन सोनवणे सो यांचे मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. हर्षवर्धन गवळी, तसेच पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोसई प्रसाद रौंदळ, असई राजु जाधव, असई रामलाल अहिरे व पोकॉ १४८४ दिनेश मावची अशा पथकाने केली आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments