Header Ads Widget


म्हसावद पोलीस ठाण्यात एनसीडी मार्फत उच्चरक्तदाब तपासणी...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत उच्च रक्तदाबदिवसाच्या अनुषंगाने शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे उच्चरक्तदाब, मधुमेह, ओरल कॅन्सल सह आदी तपासण्या करून माहिती देण्यात आली.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब नियंत्रण व उपचाराकरिता विविध उपक्रम राबविले जाताता. त्यात प्रामुख्याने लोकसंख्या अधारीत चाळणी तपासणी निदान आणि उपचार दिले जातात. दरवर्षी दि. १७ मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा केला जातो, त्या अनुषंगाने केंद्र शासनाने दि. १७ मे पासुन एक महिन्याच्या कालावधीत विविध उपक्रम घेण्याचे आदेशीत केले आहे. या अनुषगाने असंसर्गजन्यरोग चे सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांच्या आदेशाने जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुलोचना बागुल यांच्या नेतृत्वात डॉ. अशोक गोसावी, अधीपरीचारीका भावना एस. वळवी, समुपदेशक प्रदीप रावताळे, एच. आय. व्हीं लॅब टेक्निशियन अर्जुन कुवर, समुदेशक भूषण पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांच्या सह कर्मचारी यांचे उच्चरक्तदाब, मधुमेह, ओरल कॅन्सल , एच.आय.व्हि , कॉलेस्ट्रॉल लेव्हल, सी.बी.सी सह आदी तपासण्या करून माहिती देण्यात आली. यावेळी म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी राजन मोरे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|