Header Ads Widget


लग्न न जमण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढत्या अपेक्षा व त्यात होणारे व्यवहार - सौ. प्रतिभा भरत चौधरी

 



 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:नुकतेच धुळे येथे खान्देश तेली समाज मंडळ आयोजित समाजातील प्रत्येकाला भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्या मुला मुलींचे वेळेत न जुळणारे विवाह , समाजातील वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण या दोन्ही समस्यांवर विचारवंतांनी आपले विचार मांडले व यावर चर्चा ही झाली. या कार्यक्रमात कोपर्ली येथील प्रतिभा चौधरी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर आणि सुखद अनुभव, दोन जिवांचे मधुर मिलन आणि सुख दुःखात केलेले पदार्पण पण केव्हा वेळेत लग्न झाले तर . आज काल मुलामुलींचे पालक चांगलं स्थळ करता करता वयाच्या 30 शी 35 शी नंतर आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न करतात . आता तर मुलींच्या आई वडीलांच्या डोक्यात वार शिरलं आहे माझ्या मुलीला अजुन भरपुर शिकायचं, तिला तीच करीयर करायचं, तिच्या पायावर उभ रहायचं,पण त्यात तिच लग्नाचं योग्य वय निघून जातंय याकडे पण लक्ष दिलं पाहिजे . शिकलं पाहिजे पण शिकल्यावर लगेच मुलीच्या लग्नाचा विचार करत नाही तर नोकरी चा विचार करतात मुलीचं शिक्षण ही झालं आणि नोकरी च्या शोधात ही निघाली मग मुलगी नोकरी च्या शोधात व वडील चांगल्या स्थळांच्या शोधात त्यात आपणहून एखादं स्थळ सांगुन आलं तर मुलींच्या आई वडिलांकडून जो प्रश्नाचा वर्षाव होतो तो असा काहीसा मुलगा एकटा आहे का? तो चांगली नोकरी करतो का?त्याचं घर आहे का?त्यांची शेती आहे का? त्यांची गाडी आहे का?तो एकटा आहे का? मग आई वडील जवळ नको असे अनेक प्रश्न त्या मुलाला विचारली जाता तर मला त्या आपण स्वतः वयाचा 40,50 पर्यंत घर व गाड्यांचे हप्ते भरत आहोत. मुलगा चांगला आहे निर्व्यसनी आहे चांगली नोकरी आहे सुंदर आहे शिकलेला आहे तर तुम्ही हा विचार का नाही करत माझी ही मुलगी शिकलेली आहे सुंदर आहे नोकरी करते व दोघांचे लग्नाचे वय ही योग्य आहे तर का नाही तुम्ही त्याचं लग्न करून देत मग पुढे जाऊ ती दोघे चांगली नोकरी करतील दोघांच्या पगारातून घर ही घेतील गाडी घेतील त्यांचा संसार सुखाने करतील माझी तर सर्व समाज बांधवांना हीच विनंती आहे विचार बदलला परिस्थिती बदलेल फार शोधाशोध करण्याच्या नादात चांगली आपणहून आलेली स्थळ लाथाळू नका. आजचा मुला मुलीसोबत पालकांना देखील समजावणे ही काळाची गरज झाली असल्याचे ते म्हणाल्या.अशा शिक्षणाच्या नादात मुले मुली पळून जाऊन लग्न करतात त्या वेळी आपल्या हातात काही नसतं तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते अशा वेळेस आपण काही च करू शकत नाही, मी म्हणत नाही मुलामुलींना शिकवू नका पण त्यांना शिक्षणाबरोबर संस्कार पण द्या जेणेकरून ते तुमची जाणीव ठेवतील थोरामोठ्यांचा आदर करतील

Post a Comment

0 Comments

|