Header Ads Widget


लोणखेडा येथे किशोवयीन मुलीनां आरोग्यावर मार्गदर्शक शिबीर संपन्न...

 

 


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे विद्याश्रम स्पर्धा परीक्षा केंद्रावर किशोवयीन मुलींना जागतिक मासिक पाळी दिना निमित्त साने गुरुजी मित्रमंडळ शहादा तर्फे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पुजण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ स्मिता जैन होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सानेगुरजी मित्रमंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी, सचिव गुलाबराव पवार, प्रा दिनेश पावरा, जायन्टसच्या आशा चौधरी, फिजिकल ट्रेनर किसान पावरा आदी उपस्थित होते.या वेळी डॉ स्मिता जैन मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की आरोग्य तंदुरस्त राहण्यासाठी मुलींनी आहारात हिरव्या पालेभाज्या व सूर्यनमस्कार आणि पवनमुक्त आसन नियमित केल्यास मासिक पाळीतील आरोग्याच्या सर्व समस्या कमी होतील.सदर शिबिरात प्रश्नमंजुषा कार्यक्रमातील गुणवंत विद्यार्थीनी चंदना वसंत गावित, रशिला जगलाल गावित, रोया संतोष पटले, तुलसी मोहन शेमळे, किसन पावरा यांना सन्मानपत्र व बक्षिस देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.शेवटीं माणक चौधरी यांनी विद्यार्थिनींना बालविवाह विरोधी शपथ दिली,कार्यक्रमाचें प्रास्तविक गुलाबराव पवार यांनी तर सूत्रसंचालन दिनेश पवार व आभार किसन पावरा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्याश्रमेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments

|