Header Ads Widget


नंदुरबार जिल्हा मंसुरी/पिंजारी जमात सामाजिक संस्थेच्या वतीने "लाईफ टाईम अचिवमेंट अवार्ड"प्रदान ...

 




शहादा प्रतिनिधी/जुनैद अहमद:दिनांक २८/५/२०२४मंगऴवार रोजी हज्जन जैनब कमरोद्दीन मंसुरी जमाअत खाना याच्या भव्य उद्घाटन समारंभाचा आयोजन करण्यात आले होते,त्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आरीफ अली साहेब,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हाजी कलीम हसन मंसुरी,जे.के.पार्क इंटर नॅशनल फाऊंडेशन चे अध्यक्ष हाजी डाॅ.किस्मत साहेब तसेच नंदुरबार जिल्हा कमेटी चे अध्यक्ष हाजी सुलतान मंसुरी,शहादा तालुका अध्यक्ष हाजी नबी मंसुरी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन सोहळ्यात हाजी कलीम रमज़ान पिंजारी (नंदुरबार जिल्हा कमेटी सचिव) यांना मंसुरी,पिंजारी समाजात केलेल्या मौल्यवान कार्य,अंथक परिश्रम,समाजप्रेम, समाजासाठी केलेले अनेक उपक्रम, समाजाच्या उन्नतीसाठी व विकासासाठी केलेले योगदानाबद्दल नंदुरबार जिल्हा मंसुरी/पिंजारी जमात सामाजिक संस्थेच्या वतीने "लाईफ टाईम अचिवमेंट अवार्ड"प्रदान करण्यात आला. त्या बद्दल हाजी कलीम रमज़ान पिंजारी यांनी कार्यक्रमाचे आयोजक व प्रमुख पाहुणे तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्वच समाज बांधव, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मंसुरी,पिंजारी समाजातील युवकांचा,व हितचिंतकांचा मनापासून आभार मानले.

Post a Comment

0 Comments

|