Header Ads Widget


"हम दो हमारे बाराह" या चित्रपटावर कारवाई करून, पूर्ण बंदीची मागणी; AIMIM चे निवेदन सादर ...




शहादा प्रतिनिधी /जुनैद अहमद:मंगळवार रोजी शहादा मा.पोलीस निरिक्षक दीपक बुधवंत यांना निवेदन देण्यात आले, यात हम दो हमारे बारह, या चित्रपटात मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह  वक्तव्य व चुकिची माहिती देवुन,पवित्र कुराण ग्रंथांचा आयतींचा (मंत्राचा) वेगळा अर्थ लावुन त्याचे संवाद व चित्रिकरन केले गेले आहे. त्या मुळे मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या गेल्या आहेत, या चीत्रपटामुळे दोन समाजात तेढ़ निर्माण होइल व समाजात असंतोष निर्माण होइल, तरी या चित्रपट वर आणि ट्रेलर वर त्वरीत बंदि घालण्यात यावी व चित्रपट निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी AIMIM तालुका अध्यक्ष साजिद पिंजारी, शहर अध्यक्ष सद्दाम मन्सूरी, शहादा कोर कमिटी सदस्य अमानत अन्सारी, तालुका युथ अध्यक्ष अल्तमश मन्सूरी, युथ उपाध्यक्ष मोहन शाह, शहर युथ अध्यक्ष आकिब पठाण (उर्फ बाला), डॉ अजहार पठाण, डॉ सुलतान शेख, सोहेल सर मन्सूरी, आसिफ जोया, आरिफ बागवान, शाहरुख बेलदार, इरफान लोहार, समीर बेलदार, अज्जू लोहार, मुजाहिद बागवान, मोईन अन्सारी, अश्फाक बेलदार, इमरान लोहार, फिरोज बेलदार, मुजाहिद बेलदार, जुनेद सय्यद, ताहीर मन्सुरी, गोलू लोहार, व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|