Header Ads Widget


नवापुरच्या पोलिस निरीक्षकाच्या घरी २५ लाख ८७ हजार आढळले l लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कार्यवाही

प्रतिनिधी सईद कुरेशी : गुजरात राज्यातील एका प्रकरणात अटके न होत संरक्षण मिळावे यासाठी अडिच लाखांची मागणी करण्यात आली होती.अगोदर तक्रारदाराकडून एक लाख घेत आणखी पन्नास हजाराची मागणी केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती.तसेच रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.त्याच दरम्यान आरोपी चा नाशिक येथील बंगल्याची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली असल्याची माहिती मिळते आहे. तसेच नवापूर येथे शासकीय निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ व टीम तपासाकामी हजर होते. त्यांनी सकाळी दोन वाजल्यापासून इन कॅमेरा पंचासमक्ष निवासस्थानात तपास सुरू केले असता 25 लाखांपेक्षा जास्तीचा नोंद नसलेला पैसा मिळून आला आहे.शासकीय निवासस्थान म्हणजे सेटिंग्ज करायचे केंद्र तर नव्हते असे शहरात बोलले जात आहे.25 लाखांची अपसंपदा कशी आली स्त्रोतापेक्षा जास्त रक्कम मिळाल्याने ए. सी. बी चे अधिकारी आश्चर्य करीत होते.नागरीकांच्या मते पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी स्त्रोतापेक्षा जास्तिची संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासणी करून जनतेसमोर उघड करायची मागणी केली.सोने, नाणे, रोखे, नगद रक्कम,चल अचल संपत्ती, नोंद नसलेली संपत्ती याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू करून आरोपीने अवैध मार्गाने कमावलेल्या बाबींचा उलगडा होणे आवश्यक आहे.तसेच सदर पोलीस निरीक्षक यांना मदत करणारे ज्ञात अज्ञातांचाही शोध लावून त्यांचेवर कारवाई करण्यात येणे हे महत्त्वाचे आहे.जेणेकरून असे भ्रष्टाचारींना कोणीही भविष्यात साथ देणार नाही. 


दरम्यान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना नंदुरबार व नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक 28 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच तीन दिवस तपास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार आहे.


नवापूर शहरातील सूज्ञ नागरीकांनी नवापूर पोलीस ठाणे, तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या शासकीय निवासस्थाना समोर सकाळपासून तर रात्री चा सुमारास ठाण मांडले होते.तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारवायांकडे बारीक लक्ष ठेवून होते.25 लाख सापडल्याची माहिती मिळताच सूज्ञ नागरीकांनी जल्लोष केले होते.प्राप्त माहितीनुसार नवापूर शहरात पी. आय ज्ञानेश्वर वारे यांनी अनेक प्रतिष्ठीत नागरीक,राजकीय पदाधिकारी,संघटनेच्या पदाधिकारी यांना नेहमी त्रास देत हैराण केले होते.अनेकांकडून आर्थिक बाजूची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. 



ज्या अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तोच कायदा मोडत असेल तर जनता कोणाकडे दाद मागतील हा मोठा प्रश्न उभा राहतो.मलाईदार पोस्ट मिळाली पाहिजे त्या माध्यमातून बेकायदेशीर अपसंपदा गोळा करून सामान्य नागरिकांचा तळतळाट घ्यायचे पाप अधिकारी करीत असतात.वरिष्ठांनी अशा पोलीस निरीक्षकांना तालुका स्तरावर नेमणूक न देता पोलीस अधीक्षक कार्यालयातच ड्यूटी द्यावे. तसेच महामार्गावरील मलाईदार पोस्टिंग साठी अनेक लॉबिंग होत असल्याची चर्चा नवापूर शहरात चालत आहे

Post a Comment

0 Comments

|