Header Ads Widget


महिलांसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उमंग नारी ग्रुप तर्फे साडी वाॅकथाॅन स्पर्धा संपन्न...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे: शहादा येथील महिलांसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उमंग नारी ग्रुप तर्फे नुकतीच दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता साडी वाॅकथाॅन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत एकूण शहादा शहरातील ७० महिलांनी सहभाग घेऊन कमालीच्या उत्साह दाखवला. स्पर्धेत यशस्वी झालेल्या महिलांना लागलीच आकर्षक सुंदर साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या.साडी वाॅक थाॅन स्पर्धाही सकाळी सहा वाजता बस स्थानका मागील असलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. स्पर्धेच्या वेळी उमंग नारी ग्रुपच्या अध्यक्षा लीना खंडेलवाल सह रत्ना पवार, अमिता राठी, प्रतिभा गेलडा, रचना चौधरी, नयना सोनार, मनीषा अग्रवाल उपस्थित होत्या.हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. सहभागी झालेल्या महिलांनी पारंपारिक साड्या परिधान केलेल्या होत्या. स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली. पहिला वयोगट १८ ते ४० व दुसरा गट ४० वयोगटावरील असे करण्यात आले होते. स्पर्धा ही सिद्धिविनायक गणपती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सरळ दोंडाईचा रस्ता , सप्तशृंगी माता मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. स्पर्धा संपल्यानंतर लागलीच बक्षीस वितरण करण्यात आले. यशस्वी झालेले स्पर्धक महिला गट-१८ ते ४० प्रथम- वर्षा राठी, द्वितीय-राजश्री सामुद्रे, दुसरा गट वयोगट ४० वयोगट पेक्षा अधिक. प्रथम-सरिता महाले, द्वितीय- भाग्यश्री जैन या महिला यशस्वी ठरल्या.स्पर्धेसाठी उमंग नारी ग्रुपच्या रुपम सोनी, शीला महानुभाव, सीमा हलपानी, रिता जैन,जयश्री अग्रवाल यांनी योगदान दिले. महिलांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्यांना चांगली प्रेरणा मिळावी एक आगळावेगळा आनंद मिळावा हा स्पर्धेच्या दृष्टिकोन होता असे उमंग नारी ग्रुपच्या अध्यक्ष लीना खंडेलवाल यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

|