Header Ads Widget


विद्युत वितरण विभागाची कृषी पंप वाहिनीची अल्युमिनियमच्या विद्युत तारा विद्युत खांबांवरून लंपास केल्याची घटना...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा काथर्दे दिगर तालुका शहादा शिवारात दिनांक २६ एप्रिल रोजी च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत वितरण विभागाची कृषी पंप वाहिनीची अल्युमिनियमच्या विद्युत तारा विद्युत खांबांवरून लंपास केल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून विद्युत तारा देखील चोरी करण्याची हिम्मत चोरट्यांनी केली आहे.यासंदर्भात अद्याप विद्युत वितरण विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काथर्दे दिगर शिवारातील दिनांक २६ एप्रिल रोजी मध्यरात्री प्रतिक गजाननराव देसले यांच्या शेताजवळील विद्युत ट्रांसफार्मर पासून तर कृषी पंपापर्यंत साधारणता ८ गाळे अंतराची ॲल्युमिनियमची विद्युत तार ३५ हजार रुपये किमतीची विद्युत खांबावरून काढून लंपास केली. काही विद्युत तारा तोडून फेकून देण्यात आले आहेत.काथर्दे दिगर शिवारातच दिनांक २५ एप्रिल रोजी रात्री श्रीराम पाेपट पाटील यांच्या शेताजवळ पाच गाळे अंतराची अल्युमिनियम विद्युत तार वीस हजार रुपये किमतीची चोरट्यांनी लंपास केली.या व्यतिरिक्त वाघोदा तालुका शहादा शिवारात देखील कृषी पंप विद्युत वाहिनी अल्युमिनियम ची तार चोरीस गेल्याचे सांगण्यात आले आहे.शहादा तालुक्यात कृषी पंप विद्युत वाहिनीच्या अल्युमिनियमच्या तारा विद्युत खांबावरून चोरीस नेल्याच्या तीन घटना घडल्याने खळबळ माजली आहे. अद्यात चोरटे अंधाराच्या फायदा घेऊन शिवाय रात्रीच्या वेळी शेती भागात विद्युत पुरवठा बंद असतो.त्याच्या फायदा चोरटे घेतात.एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्युत तारा चोरी करण्यासाठी चोरट्यांनी वाहनांच्या वापर केल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे.काही विद्युत तांत्रिक माहिती असलेल्या व्यक्तींच्या देखील उपयोग घेतला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.संबंधित शेतकऱ्यांनी शहादा येथील व प्रकाशा येथील विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आहे. मात्र अद्याप कोणताही अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आलेले नाहीत.पंचनामा देखील केला नसल्याने शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.विद्युत तारा चोरीस गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे विद्युत पुरवठा बंद असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.त्वरित दखल घेण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|