नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे:शहादा तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेचे अध्यक्ष जिल्हा समन्वयक प्राचार्य आय डी पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सचिव प्रा जी एन सोनवणे होते. व्यासपीठावर शहादा तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा व्ही सी डोळे व उपाध्यक्ष प्रा आर् एन सूर्यवंशी निवृत्त उपप्राचार्य इंदिरा पटेल उपप्राचार्य कल्पना पटेल, एस जे पटेल हे उपस्थित होते सुरुवातीला सेवानिवृत्त व विविध कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष प्रा व्ही सी डोळे यांनी केले . अध्यक्षीय स्थानावरून प्राचार्य आय डी पटेल यांनी मार्गदर्शन करताना नवीन पिढीसाठी सर्वकाही न मागता मिळाले आहे त्याचे महत्त्व टिकवून ठेवा. बाजूच्या राज्यातील शिक्षकांची परिस्थिती व आपल्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या परिस्थिती यात तफावत आहे. आपल्याला मिळालेल्या वेतन श्रेणी ह्या केवळ आणि केवळ संघटनेच्या जोरावर मिळाल्या आहेत. आणि त्यामुळे संघटना स्तरावर सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. संघटनेने उच्च माध्यमिक विद्यालयासाठी एक वेगळे उपप्राचार्य पद देखील मान्य करून घेतले हे सर्व ताकद संघटनेची आहे . शालार्थ आय डी मिळवण्यासाठी पुण्याच्या फेऱ्या कराव्या लागत होत्या परंतु आता शिक्षण उपसंचालक स्तरावर आणण्यात संघटना कारणीभूत आहे . आणि त्यामुळे शालार्थ आय डी देखील सोप्या झाल्या आहेत. 24 वर्षाच्या निवड श्रेणीसाठी एम फिल ही पदवी आवश्यक होती परंतु 24 वर्षाच्या कालावधी नंतर एम फिल अट रद्द करीन निवड श्रेणी प्राप्त करून देण्यासाठी संघटना लढली व त्याला यश आले. पुढे बोलताना ते म्हणाले की संघटना आहे तर आपण आहोत आणि संघटनेमुळेच आपल्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेण्या या प्राप्त होत असतात किंवा आपल्या मागण्या मंजूर होत असतात त्यामुळे संघटनेच्या मागे ताकदीने उभे राहणे गरजेचे आहे. कार्यक्रमात जिल्हा सचिव प्रा. जी एन सोनवणे यांनी महासंघाने घेतलेल्या भूमिका व शिक्षणमंत्र्यांशी वेळोवेळी होत असलेल्या चर्चा याविषयी माहिती दिली दहा वीस तीस आश्वासित वेतन श्रेणी, आय टी विषय शिक्षकांच्या मागण्या एन पी एस पी एफ स्लिप यांचे संपूर्ण माहिती यावेळी दिली. कार्यक्रमात प्रा इंदिरा पटेल, प्रा भूषण निकम, प्रा विलास पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पुष्कर शास्त्री यांनी तर आभार प्रा.शरद पाटील यांनी मानले.
0 Comments