Header Ads Widget


महिला 'उमंग नारी' ग्रुप तर्फे साडी वाॅकथाॅन स्पर्धेचे आयोजन...

 


प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे:शहादा येथील महिला उमंग नारी ग्रुप तर्फे दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता साडी वाॅकथाॅन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.उमंग नारी ग्रुप तर्फे प्रथमच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केल्याने महिलांमध्ये कमालीचा उत्साह आहे.स्पर्धा सकाळी सव्वा सहा वाजता शहादा शहरातील बस स्थानकच्या मागील बाजूस असलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरापासून सुरुवात होईल सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसस्थानक शासकीय विश्रामगृह खरेदी-विक्री व्यापारी संकुल सप्तशृंगी माता मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप होईल.स्पर्धाही दोन गटात घेतली जाणार आहे.पहिला वयोगट १८ ते ४० व दुसरा वयोगट ४० पासून पुढे असा राहील.स्पर्धेसाठी नियमावली करण्यात आलेली आहे.दोन्ही गटात प्रथम व द्वितीय येणाऱ्या विजेत्या स्पर्धक महिलांना आकर्षक सुंदर अशा साड्या बक्षीस दिल्या जाणार आहेत.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आवश्यक त्या सुविधा ग्रुप तर्फे उपलब्ध केलेले आहेत तरी या वाॅकथाॅन स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान उमंग नारी ग्रुप तर्फे करण्यात आलेले आहे.महिला या सतत कार्यमग्न असतात.या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ मिळावा शिवाय महिलांचे आरोग्य संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी हा दृष्टिकोन स्पर्धेच्या असल्याचे उमंग नारी ग्रुप तर्फे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

|