नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:
पुरुषोत्तम नगर शहजादा येथे दिनांक २९ एप्रिल पासून नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य अशा विठ्ठल-रुक्माई मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रख्यात भागवताचार्य वेदमूर्ती खगेंद्र महाराज यांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात येणार आहे.या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील शेकडो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्या आधारावर मंदिर ट्रस्टमार्फत कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.साधारणता तीन दिवस प्राणप्रतिष्ठा धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहे.दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता विठ्ठल-रुक्माई व महादेवा मंदिराची शिवलिंगाच्या मूर्तींची गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.ग्राम प्रदक्षिणा केली जाणार आहे.दुपारी १२वाजता गणपती पूजन व अग्निस्थापन पूजन केले जाणार आहे.रात्री ८ वाजता भागवताचार्य खगेंद्र महाराज यांचे प्रवचन होईल.दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता प्रधान हवन पूजा होईल त्यानंतर रात्री आठ वाजता मंदिराच्या आवारात गरबा नृत्य होणार आहे.१ मे रोजी सकाळी साडेसात वाजता होम हवन दुर्गा पुजा व त्यानंतर प्राणप्रतिष्ठा पूजा होईल.सकाळी साडेअकरा वाजता महाप्रसाद वाटप होईल.तरी या कार्यक्रमाच्या लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन विठ्ठल-रुक्माई बहुउद्देशी सेवा संस्था पुरुषोत्तम नगर तालुका शहादा यांनी केले आहे.कार्यक्रमासाठी मंदिर सह परिसर सुशोभित करण्यात येत आहे.
0 Comments