नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र विठ्ठल पाटील यांना नंदुरबार येथील 'आश्रय' या बहुउद्देशीय संस्थेकडून 2023-24 साथीचा उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राध्यापक डॉ. राजेंद्र विठ्ठल पाटील यांनी मागील वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजभिमुख विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जाणीव जागृती, रक्तदान शिबिराच्या आयोजनातील सहभाग, पर्यावरण संवर्धन व पशुपक्ष्यांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबाबत नंदुरबार येथील आश्रय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून यांना सन 2023-24 या वर्षाच्या नंदुरबार जिल्हास्तरीय कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा हा तळोदा येथे समाजकार्य महाविद्यालयात करण्यात आला. 'आश्रय' संस्थेच्या सचिव मा. मोनिका हरीश मोरे व समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उषा वसावे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉ. राजेंद्र पाटील यांना गौरविण्यात आले. साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल, डॉ. एस. डी. सिंदखेडकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. वर्षा चौधरी, डॉ. वजीह अशहर व महाविद्यालयाच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
0 Comments