Header Ads Widget


नंदुरबार येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाची दुरावस्था दूर करा;हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे: येथील नगरपालिकेने कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भव्य असे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांचे स्मारक उभारले आहे. या स्मारक परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते परंतु गेल्या काही वर्षांपासून हे सुशोभीकरण पूर्णपणे खराब झाले आहे, त्याठिकाणी प्रचंड घाण होत असते स्मारका जवळील घाणीचे प्रादुर्भावआणि स्मारकाचा एकूण दुरावस्था दुर कराव्या यासह विविध मागण्यांचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीने पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना दिले.

निवेदनात मागणी करण्यात आली आहे की,१) स्मारकाची स्वच्छता राखण्यासाठी दररोज दोन्ही वेळा सफाई कर्मचारीची नेमणूक करावी.२) स्मारकाचा देखभालीसाठी वाचमन याची नेमणूक करावी.३) स्मारक स्वच्छ करण्यासाठी आणि तेथील झाडांना पाणी देण्यासाठी नळ आणि पाणीटाकी उपलब्ध करून द्यावी.४) पुतळ्याला माल्यार्पण किंवा पूजन- अभिषेक करण्यासाठी शिडीची (जिनाची) व्यवस्था करावी.५) स्मारक परिसरात सुशोभीकरण पुन्हा करावे.६) वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचा खाली माल्यार्पण करण्यासाठी अर्धाकृती शिल्प लावावे.७) नाट्य मंदिर येथील शिवछत्रपती यांचा पुतळ्या अवतीभवती जसे महाराजांचे शिल्प आहे त्याच धरतीवर महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळ्यालाही शिल्प उभारावे. यावेळी हिंदु सेवा सहाय्य समितीचे प्रमुख नरेंद्र पाटील, राजपूत समाजाचे ऍड अविनाश पाटील, अमृत राजपूत, चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत, संदीप राजपूत, रणजित राजपूत, मयुर राजपूत, धर्मसेवक पंकज डाबी, सुयोग सूर्यवंशी, जयेश भोई, पंकज मुसळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|