Header Ads Widget


पंचायत समिती शिक्षण विभाग मार्फत मतदार साक्षरता जनजागृतीसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे: शहादा येथील पंचायत समिती शिक्षण विभाग मार्फत मतदार साक्षरता जनजागृती शहरातील शिक्षकांच्या सहभागाने दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ५०० पर्यंत शिक्षक व महिला शिक्षकांनी सहभाग घेतला होता.मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभ शहादा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आला. यावेळी प्रांत अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक गिरासे गटशिक्षणाधिकारी डॉ.योगेश सावळे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे ममता पाटील पी.व्ही.माळी उपस्थित होते.प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभ तहसीलदार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक गिरासे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.

मॅरेथॉन स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सरळ पुरुषोत्तम मार्केट शासकीय विश्रामगृह सप्तशृंगी माता मंदिर दोंडाईचा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मॅरेथॉन स्पर्धेच्या समारोप करण्यात आला.विशेष म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षक व शिक्षिकांमध्ये कमालीच्या उत्साह होता.अनेक वयस्कर शिक्षकांनी देखील सहभाग नोंदविला.प्रांत अधिकारी सुभाष दळवी व तहसीलदार दीपक गिरासे यांनी सहभागी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ.योगेश सावळे यांनी केले.सध्या लोकसभेच्या निवडणुका असून मतदारांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून शिक्षण विभागामार्फत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले होते.पंच म्हणून हरीश साळुंखे दीपक कोळी यांनी काम पाहिले.मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन लोणखेडा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.अरविंद कांबळे यांनी केले तर केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे महेंद्र बैसाणे शिरीष पाटील व एस.एस.अहिरे यांनी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments

|