Header Ads Widget


शहादा येथे गांधीनगर वसाहतीत झुलेलाल मंदिरात गुढीपाडवा उत्सव साजरा..

 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे: शहादा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दिनांक ७ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता गांधीनगर वसाहती जवळील झुलेलाल मंदिरात गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला शेकडो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गुढीपाडवा उत्सवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते अजय शर्मा ज्येष्ठ कार्यकर्ते भगवानदास अग्रवाल शहादा तालुका संघचालक डॉक्टर हेमंत सोनी तुषार पाटील पिनाकिन पटेल ललित अग्रवाल मीनानाथ सोनार संजय कासोदेकर के.के.सोनार डॉक्टर योगेश चौधरी सह मान्यवर उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागीय सहकार्यवाहक संजय पुराणिक व तुषार शर्मा उपस्थित होते. प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक स्थापना वर्षदिनानिमित्त पिनाकिन पटेल यांनी गीत सादर केले.बौद्धिक सत्रात मार्गदर्शन करतांना संजय पुराणिक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक सदस्याने देश सेवेची व देशभक्तीची कर्तव्ये पाळावीत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार देश पातळीवर पोचवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.तुषार शर्मा यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दोंडाईचा रस्त्यावरील सप्तशृंगी माता मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात पथसंचलन केले जाणार आहे तरी पथसंचलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तालुका संघ चालक डॉक्टर हेमंत सोनी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|