Header Ads Widget


शेवाळी चे पिण्याचे पाण्याचे संकट तूर्तास टळले;गावासाठी पाणीदूत गुलाबराव नांद्रे आले धावून...

 

साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: धुळे जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे भूजल पातळीत घट निर्माण होत आहे साक्री तालुक्यात पश्चिम पट्टयाचा काही भाग वगळता सर्वत्र विहिरी,धरणे तळ गाठू लागल्याचे दिसून येत आहे काही ठिकाणी तर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर काही ठिकाणी आठ ते दहा दिवसांनी नळांना पाणी येत असल्याने तालुक्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, माळमाथा परिसर ची अवस्था तर खूपच बिकट आहे अशीच अवस्था साक्री शहरापासून अवघ्या ५ कि.मी.अंतरावर असलेल्या शेवाळी (दा.) गावाची होणार होती कारण गावासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी तळ गाठू लागल्या होत्या त्यांची खोली वाढवून हि गावाची लोकसंख्या लक्षात घेता पाणी पुरवठा कमी पडू लागला होता अशा वेळी गावातील माजी पंचायत समिती उपसभापती तथा माजी सरपंच नितीन साळुंके व उपसरपंच केतन साळुंके हे पर्यायी मार्ग शोधत असतांना त्यांनी गावातील गुलाबराव सूपडू नांद्रे यांची भेट घेऊन त्यांच्या विहिरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी तात्काळ विना विलंब न करता माजी विहीर आपल्या धरणाकाठी असून तिला देवाच्या कृपेने भरपूर पाणी असून आज आपल्या गावावरती जे पिण्याचे पाण्याचे संकट निर्माण होणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या विहिरीमधून मोटारीद्वारे पाणी काढून ते पाईप लाईन करुन आपल्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकावे व तेथून पुढे पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत टाकावे जेणे करून आपल्या गावाची पिण्याचा पाण्याची समस्या सुटेल त्यांनी गावासाठी पिण्याच्या पाण्याच्या समस्येला प्राधान्य देत शेतात येणारे गवार, कांदे असे पीक न घेता पाणी पाजणे पुण्यांचे काम आहे ते आपले कर्तव्य आहे 

अशी भूमिका घेवून ते एक प्रकारे गावासाठी पाणीदूत ठरले. शहरी भागात आज दुष्काळात पाणी विकून पैसे कमावणारे लोकांची संख्या हि कमी नाही आहे ग्रामीण भागात ही एकीकडे एक हंडा पाण्यासाठी पायपीट करून भटकंती करून पिण्याचा पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे पण गुलाबराव नांद्रे सारखे पाणीदूत प्रत्येक गावात तयार झाले तर नक्कीच काही गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. तीव्र पाणी टंचाईच्या काळात शेवाळी ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा व पिण्याचा पाण्याचा भार कमी करुन त्यांनी इतर गावापुढे ही आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी केलेले कार्य खरेच वाखाणण्याजोगे असुन नाही तर खरच शेवाळी गावातील माता बघिनी यांच्यावरती ही हंडा भर पाण्यासाठी वणवण करावी लागली असती त्यांच्यांमुळे या कार्यामुळे शेवाळी गाव तूर्तास तरी पाणी टंचाई पासून वाचले अशा वेळी गावकऱ्यांकडून त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments

|