साक्री प्रतिनिधी/ अकिल शहा: मतदान जनजागृतीसाठी धमनार येथिल विधायक युवा संघटना संचलित माध्यमिक विद्यालया तर्फे विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली.निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी धमनार येथील माध्यमिक विद्यालयाच्या वतीने भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या जनजागृती रॅलीने गावाच्या ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.विविध घोष वाक्य असलेले फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विधायक युवा संघटना संचलित माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक लतिफ मन्सुंरी व शिक्षक जे.व्ही.खैरनार, लक्ष्मीकांत सोनवणे, दिपक काटके, रेखा खैरनार, पोपट गायकवाड,जी.डी.खैरनार, अनिल वाघ, राहूल भामरे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments