नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे: बी.ए. व बी.सी.ए. ची पदवी संपादन केल्यानंतर आपण चांगली नोकरी करीत असतांना एक चांगली आदर्श गृहिणी असणार आहे. २३ वर्षापूर्वी संस्थाध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील यांनी सुरु केलेल्या महाविद्यालयाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. एक दर्जेदार शिक्षण महिलांना मिळावे यासाठी हे महाविद्यालय सुरु करण्यात आले. समाजात आजही अनेक जण हलाखीच्या परिस्थिती मुळे उच्च शिक्षणापासून लांब आहेत.अनेकांना विद्यार्थ्यांना पेन्सिल खोडरबर चे देखील ज्ञान नाही.आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग करुन आपण नक्की अशा गरजू मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार अशी अपेक्षा महाविद्यालयाच्या विकास समितीच्या सदस्या प्रीती पाटील यांनी व्यक्त केली. शहादा तालुका एज्युकेशनल सोसायटी अँड को-ऑप एज्युकेशन सोसायटी संचलित व श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई संलग्नित, सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागातर्फे तृतीय वर्ष बी.ए. व बी.सी.ए. च्या विद्यार्थिनींसाठी निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आय. जे. पाटील, प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप मराठे व महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा.डॉ. कैलास चव्हाण उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आय.जे. पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना सांगितले की, बी.ए., बी.सी.ए. नंतर तुम्ही नव्या जीवनाची वाटचाल सुरु करणार आहेत. महाविद्यालयात राबविले जाणारे विविध कार्यक्रम उपक्रमांमुळे तुम्ही कर्तुत्ववान बनले आहेत. वेळेचे नियोजन करून वेगवेगळे कौशल्ये आत्मसात करून सक्षम होऊन तुम्ही महाविद्यालाचा बाहेर पडणार आहेत. व्यक्तिमत्वाचा विकास असा करा की आपण शंभर लोकांमध्ये वेगळे दिसले पाहिजे त्याच्यावरच माणुसकीचे चरित्र मोजले जाते. आई वडिलांची ओळख तुमच्या मुळे झाली पाहिजे असे चरित्र तुमचे असले पाहिजे. यावेळी प्राचार्य डॉ. संदीप मराठे व प्रा.डॉ. कैलास चव्हाण यांनीही आपले मनोगतातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात कु.मयुरी महाजन, रुंकु नाईक, वैशाली महाजन, प्रियंका पवार, रुपाली पाटील, तारू पाडवी यांनी शिक्षण घेतांना महाविद्यालयातील तीन वर्षाचा अनुभव सांगितला. विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलीत. त्या नंतर प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी तृतीय वर्षातील विद्यार्थिनींना भेटवस्तू दिल्यात.कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. खेमराज पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन कु. नेहा जाधव, कंचन सोलंकी यांनी केले. स्वागत गीत कु. अलका कोळी हिने सादर केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार कु. ऋतिका भोई हिने मानले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.डॉ.संतोष तमखाने, प्रा.काकासो अनपट, प्रा. देवचंद पाडवी, प्रा.योगेश भुसारे, प्रा.मंगला पाटील, प्रा.रेणुका पाटील, प्रा. कविता चौधरी, प्रा.नेहा पाटील, प्रा.कविता गुलाले उपस्थित होते. निरोप घेणाऱ्या विद्यार्थिनींना संस्थेचे चेअरमन वनश्री मोतीलाल पाटील, व्हा.चेअरमन हिरालाल नगिन पाटील, सचिव प्रा. ए.के. पटेल, संस्थेचे संचालक अभिजीत पाटील तसेच संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments