Header Ads Widget


ह.भ.प.श्री.रामदास खैरनार "वारकरी सेवा रत्न जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित...

 



साक्री प्रतिनिधी /अकिल शहा: गेल्या अनेक दशकांपासून वारकरी सेवेत रुजू असलेले धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विटाई येथील रहिवासी ह.भ.प.श्री.रामदास दयाराम खैरनार यांना एकादशी च्या दिवशी भामेर (ता.साक्री) विठ्ठल रुक्माई मंदिर गोशाळा ट्रस्ट आणि उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळातर्फे ११० वारकरी सेवा रत्न पुरस्कार प्राप्त वारकऱ्यांच्या उपस्थितीत अनुक्रमे सन २०२४ "वारकरी सेवा रत्न जीवन गौरव पुरस्कार"आणि "वारकरी सेवा रत्न" पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे ह.भ.प.श्री.रामदास खैरनार यांचे वडिलोपार्जित वारकरी संप्रदायात योगदान राहिले आहे त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही वारकरी संप्रदायासाठी निस्वार्थीपणे सेवा करीत आहे त्यांच्या या कष्टाचे फळ म्हणून आनंदाची बाब म्हणजे त्यांची शासनाकडून मानधनासाठी निवड करण्यात आली आहे. ह.भ.प.श्री.रामदास दयाराम खैरनार यांना लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाबद्दल गोडी होती. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायाकरिता वाहून दिलेले बघावयास मिळते याच गावातील ह.भ.प.श्री.भास्कर रघुनाथ खैरनार यांना वारकरी सेवा रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे या दोन्ही वारकऱ्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल विटाई येथील सामाजिक, राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिकांनकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments

|