Header Ads Widget


शेवाळीत मतदान जनजागृतीतंर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

 

साक्री प्रतिनिधी /अकिल शहा : धुळे जिल्ह्यातील सर्व गावातील नागरीकांनी सोमवार, 8 एप्रिल, 2024 रोजी आपल्या गावात होणाऱ्या मतदार जनजागृती कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साक्री तालुक्यातील शेवाळी गावात सोमवारी दि. 8 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 2.00 वाजेदरम्यान स्वीपअंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. 

जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वतीने मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात गावातील नागरिक, ग्रामसेवक, सर्व प्राथमिक विद्यार्थी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा कार्यकर्ती, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते, भजनी मंडळी यांनी सहभागी होवून गावात महारॅली काढली.तसेच यावेळी मतदान वाढीसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी गावातील नागरिक, सर्व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मतदानासाठी संकल्प पत्र भरुन घेण्यात आले. त्याचबरोबर गावांतील सर्व मतदारांना व्होटर हेल्पलाईन ॲपची माहिती देवून प्रात्याक्षिकही दाखविण्यात आले सदरचे ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले असून जेणे करुन ॲप डाऊनलोड केल्यावर नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी, मतदार यादीत नाव, पत्ता दुरुस्ती त्यांच्या मोबाईलवर करता येईल. या वेळी शेवाळी गावाच्या प्रथम नागरीक सरपंच सुरेखा साळुंखे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सदस्या ,ग्रामविकास अधिकारी एम.जी.सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी, जि.प.केंद्र शाळा शेवाळी चे मुख्याध्यापक नानासाहेब सोनवणे,शिक्षक दिपक देवरे, प्रतीभा साळुंके, संगीता पाटील, चंदन सोनवणे, रेविता लोखंडे, उन्मेद बचत गटाचे अधिकारी व कार्यकर्त्या, गावातील नागरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|