Header Ads Widget


८ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन..


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे: शहादा येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती साठी शहादा शहरात शिक्षकांसाठी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रांत अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे गटशिक्षण अधिकारी डॉ.योगेश सावळे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे स अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मॅरेथॉन स्पर्धा सकाळी साडेसात वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होईल व दोंडाईचा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ पुतळ्यापर्यंत राहणार आहे.स्पर्धेत शहादा शहरातील प्रत्येक शाळेतील 50% शिक्षक प्रशिक्षिकांना सहभागी होणार आहेत.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांनी पांढरा टी-शर्ट व ट्रॅक सूट परिधान करून यावे व वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी डॉ.योगेश सावळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|