Header Ads Widget


अमन काॅलनीतील रहिवासी समस्यांनी त्रस्त, तीव्र आंदोलनाचा इशारा...

 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे : अमन कॉलनी परिसराकडे नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असून परिसरातील नागरीक समस्यांनी त्रस्त झाले आहेत.समस्या सुटाव्यात यासाठी स्थानिक रहिवाशांनी एकत्रित येवून नगर पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.समस्या न सुटल्यास कायदेशीर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.शहादा शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील अमन कॉलनी येथील नागरीक विविध समस्यांनी त्रस्त असून पालिका प्रशासनाने दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरले आहे. अमन कॉलनीतील नागरिकांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले आहे. त्यात मोकाट वराहांचा बंदोबस्त करणे, डास प्रतिबंधक औषधी फवारणी करणे, रस्ते व गटार बनवणे, इलेक्ट्रिक लाईट पोल उभारणे, खुली जागा विकसित करणे, परिसराची नियमित साफसफाई करणे या विषयांचा समावेश असून तात्काळ समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.जर तात्काळ समस्या सोडवण्यात आल्या नाही तर नगर पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन दिले आहे. निवेदनावर प्राचार्य मेहमूद खाटीक, फरीद शाह, हाजी इफ्तेखार खाटीक, हाजी तलहा मंसूरी,अमान खाटीक, तैय्यब खाटीक,जाविद पठाण, रईस शेख, मोहसीन खाटीक यांच्यासह परिसरातील त्रस्त नागरिकांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments

|