Header Ads Widget


अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांविरुध्द पिंपळनेर पोलीसांची कारवाई; एकूण ३,६०३६५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करीत जागीच केला नष्ट.

साक्री प्रतिनिधी (अकिल शहा): आगामी लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, सो, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे व मा. पोलीस अधीक्षक साो, धुळे, यांनी घेतलेल्या आढावा बैठकीचे अनुषंगाने तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक साो, धुळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, धुळे ग्रामीण विभाग साक्री, यांचे मार्गदर्शना खाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी आगामी लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागू झाले पासुन ते आजपावेतो अवैधरित्या गावठी दारु बनविणारे व विक्री करणारे तसेच विना परमिट देशी विदेशी दारु विकणारे यांचे विरुध्द वेळो वेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी तसेच गुजरात राज्यसीमेलगत असणाऱ्या गावांमध्ये हातोडे चालवून आतापर्यंत आरोपीतां-विरुध्द दारुबंदी कायद्यान्वये १६ गुन्हे दाखल करुन आतापर्यंत गावठी हातभट्टीची दारु व कच्चे रसायन ५४६८ लिटर व देशी/ विदेशी ५२.४२ दारु लिटर असा एकुण ३,६०३६५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट / हस्तगत करुन कारवाई केली आहे.

सदर कारवाईत पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे, पोलीस उपनिरीक्षक भुषण शेवाळे यांचे सह पिंपळनेर पोलीस ठाणे येथील स्टाफ अशांनी केली. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे वतीने जाहीर आव्हान करण्यात येते की, आपल्या गावातील कोणी अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार किंवा विक्री करत असेल त्याबाबची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्यास कळवावे.

पिंपळनेर पोलिसांकडून आव्हान :- पिंपळनेर पोलीस स्टेशन च्या हद्दीत असलेल्या गावातील कोणी अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार किंवा विक्री करत असेल त्याबाबची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्यास तात्काळ कळवा.

Post a Comment

0 Comments

|