Header Ads Widget


महिला महाविद्यालयात मतदान जागृतीसाठी चला मतदान करूया या बाबत वोटर सेल्फी पॉईंटचे उद्घाटन..

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा  येथील कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या वतीने मतदार जागृती अभियान अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.  भारत सरकारचे उच्च शिक्षण मंत्रालय , युवा कार्य व खेळ मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय पुणे , स्वीप , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव , सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग , विद्यार्थी विकास विभाग , मतदार साक्षरता क्लबव राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती अभियाना अंतर्गत चला मतदान करूया याबाबत वोटर फॉर सेल्फी फलकाचे उद् घाटन , लोकशाहीत मतदानाचे महत्त्व या विषयावर निबंध स्पर्धा , चला मतदान करूया या विषयावर रांगोळी स्पर्धा व मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या विषयावर घोषवाक्य स्पर्धा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव तर उद् घाटक म्हणून सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव , तर प्रमुख अतिथी म्हणून संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. हिमांशु जाधव , प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील , राज्यशास्त्र विभाग प्रमुख व मतदार जागृती नोडल अधिकारी प्रा. डॉ. अनिल साळुंके , क्रीडा संचालक प्रा. डॉ. भारत चाळसे , ग्रंथपाल प्रा. डॉ. सन्ना डांगे मतदार जागृती अभियान सहकारी संयोजक राजेश राठोडसह सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मतदार जागृती अभियान अंतर्गत चला मतदान करूया याबाबत वोटर सेल्फी पॉइंट या फलकाचे उद् घाटन सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव व सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रास्ताविक करतांना प्रा. डॉ. अनिल साळुंके यांनी , शहादा परिसरातील मतदार व महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती अभियान राबविण्यात यावे याबाबत प्रा. संजय जाधव व वर्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार असून त्या निमित्ताने वोटर सेल्फी पॉईंट हा फलक शहादा शहरातील प्रमुख चौकांमध्ये फिरत्या स्वरूपात ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी मतदारांनी आपला सेल्फी फोटो काढून तो आपल्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवावा तसेच विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाने स्वतंत्र ऑनलाईन लिंक तयार केली असून त्या ठिकाणी सदर फोटो अपलोड करावे तसेच वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. संजय जाधव , परीक्षेत एका गुणाला , क्रिकेटमध्ये एका रनाला तसे लोकशाहीत एका मताला फार महत्त्व आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश असून लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या उत्सव व देश हितासाठी मतदाराने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे प्रत्येकाने सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करावे , असे प्रतिपादन केले. . याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा वर्षा जाधव यांनी ; लोकशाहीच्या बळकटीसाठी व देशाच्या प्रगतीसाठी पाच वर्षातून एकदा आपल्याला मतदानाची संधी ही मिळत असते मतदान हे केवळ हक्क नसून ते पवित्र कर्तव्य असल्याने मतदानाच्या दिवशी जास्तीत मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे तसेच आपल्या परिचयातील मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे , असे आवाहन केले. याप्रसंगी सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ. अनिल साळुंके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. भारत चाळसे , प्रा. डॉ. प्रसन्न्ना डांगे , सहकारी संयोजक राजेश राठोडसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|