नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने "पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियान" आयोजन पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे करण्यात आले होते. या अभियानाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई पाटील, प्रमुख अतिथी, वक्ते श्री सुधाकर पी. गाणू, डायरेक्टर (सेल्स अँड मार्केटिंग), एग्री सर्च (इंडिया) प्रायवेट, कृषी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ पी.एल.पटेल, महाविद्यालाचे प्राचार्य डॉ एस.पी.पवार उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली. यावेळी मयूरभाई पाटील यांनी मार्गदर्शन सांगितले की, पर्यावरण संरक्षण हि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक बाब असल्यामुळे पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ही समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारवयास पाहिजे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन हि श्वासाइतकी महत्वाची गरज आहे. सध्याच्या युगात पर्यावरणविषयक जनजागृती करणे हि अनिवार्य बाब ठरली आहे. ढासळत्या पर्यावरणाबद्दल विचार करताना ओझोनचा विरळ होत चाललेला थर, ग्लोबल वार्मिंग, जंगलाच प्रमाण कमी, कचऱ्याची विल्हेवाट आदी अनेक बाबीवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यावरणाकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे. पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे. यावेळी वक्ते श्री सुधाकर पी. गाणू यांनी मार्गदर्शन करतांना संगीतळे की, सध्या आपले पर्यावरणात कशा प्रकारे ऋतुचक्र बदलेले गेले आहे आणि त्याच्यामुळे वातावरणावर होणार परिणाम लक्षात घेऊन पर्यावरणाचे संरक्षण होणे अत्यावश्यक आहे. वातावरण दूषित झाले तर त्याचा परिणाम सर्वाना होत असतो. नवनवीन पद्धतीचा वापर करून पर्यावरण संरक्षण व संवर्धन होऊ शकते. पर्यावरण मानवासाठी कसे आवश्यक आहे, पर्यावरणावर आधारित संतुलीत जीवनशैली कशी आहे, एक सामान्य नागरिकसुद्धा पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काय करू शकतो आदी इत्यंभूत माहिती देऊन विद्यार्थांचा प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. सदर अभियानात 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या अभियानासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सदर अभियानाचे सूत्रसंचालन, संयोजक, प्रा. आकाश जैन यांनी केले तर आभार, संयोजक, प्रा.दिवाकर पाटील यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सौ. अमृता पाटील, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहुल लोव्हारे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
0 Comments