Header Ads Widget


लक्ष्मीनारायण ट्रस्ट संचलित लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व पदवीदान समारंभ आयोजित ...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे 

शहादा येथील लक्ष्मीनारायण ट्रस्ट संचलित लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन योगेश पाठक होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षण समिती चेअरमन ॲड.राजेश कुलकर्णी संचालक संतोष सोनार प्रवीणा कुलकर्णी माजी मुख्याध्यापिका माया जोहरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा तांबोळी प्रा.नयना पाटील उपस्थित होत्या.प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वार्षिक परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परीक्षा शालाबाह्य स्पर्धा क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र तसेच स्मृतिचिन्ह शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला.काही विद्यार्थ्यांना पदवीदेखील बहाल केली.विशेष म्हणजे कार्यक्रमाला पालक वर्ग देखील उपस्थित होते. यावेळी बोलतांना ॲड.राजेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षा व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.विद्यार्थ्यांनी मेहनत करावी म्हणजे यश आपोआप मिळते.जीवनात चांगले संस्कार बाळगून शिक्षकांच्या आदर करा असे आव्हान करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रेखा पाटील व भारती अहिरे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार वैशाली पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

|