Header Ads Widget


धडगाव कलाल समाजातर्फे एकनाथ सष्टीच्या कार्यक्रम आयोजित.. ;


शहादा प्रतिनिधी/अल्ताफ शेख 

समाजाने एकत्रित यावे एकत्रित येऊन एकमेकांचे सुखदुःख व परिवारातील विचारांची देवाण-घेवाण चांगल्या पद्धतीने करून समाज बळकट करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी केले. 


शहादा ,धडगाव कलाल समाजातर्फे एकनाथ सष्टीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शहादा कलाल समाज अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र कानडे, समाजातील जेष्ठ नागरिक रमाकांत कलाल, सदाशिव कलाल हे होते. सुरुवातीला कलाल समाजाचे आराध्य दैवत सहस्रार्जुन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतसत्कार करण्यात आला. पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की समाजातील चालीरीती संस्कृती यांना जोपासत षष्ठीच्या कार्यक्रम अगदी जोमात


उत्साहात साजरा केला गेला पाहिजे. एकनाथ महाराजांचे आचार, विचार व त्यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला समाज वाटचाल करत आहे. समाजातील सर्व घटक हा आपापल्या कार्यरत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले कार्य करत आहे, त्यामुळे समाजाचे नाव चांगल्या पद्धतीने शहरात पसरले आहे याच्या मला आनंद आहे. समाज जरी अल्प असला तरी आपल् अस्तित्व हे टिकवून आहे. विद्यार्थी चांगले घडावेत त्यांनी शिक्षणासोबतच संस्कार देखील आत्मसात करावे याविषयी आपले मत मांडले. कार्यक्रमात डॉ. विजय कलाल, डॉ. राजेंद्र कानडे यांनी देखील आपले मत मांडले. समाजातील सर्व घटकातील लोक या निमित्ताने एकत्रित आले होते व विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन पुढील नियोजन करण्यात आले. नाथषष्ठीच्या कार्यक्रमाचे आयोजन कपिल कलाल यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विजय नारायण कलाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ केले होते. कपिल कलाल यांच्या वडिलांची आंतरिक इच्छा असल्यामुळे हा कार्यक्रम कपिल कलाल यांनी केल्याचे सांगण्यात आले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास जावरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहादा धडगाव कला समाज पंचमंडळाचे पदाधिकारी व सन्माननीय सदस्य यांनी केले. कार्यक्रमास शहादा शहरासह मलोणी, मामाचे मोहिदा, तोरखेडा या ठिकाणाहून मोठ्या संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता ही भोजन प्रसादाने झाली.

Post a Comment

0 Comments

|