Header Ads Widget


कोळी जमातीचा उमेदवार नंदुरबार मतदार संघातून उभा करण्यासाठी कोळीसमाजाने समाज भवनात नुकतीच बैठक

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे 

कोळी जमातीचा उमेदवार नंदुरबार मतदार संघातून खासदार म्हणून उभा करण्यासाठी वाघाडी येथील कोळी समाज भवनात नुकतीच बैठक झाली. सर्वांनुमते फक्त निष्ठावंत, निस्वार्थी एकनिष्ठ कोळी समाजाची भक्कम उन्नती साधणारा असावा उमेदवार असावा . नंदुरबार मतदार संघातून चार उमेदवारांपैकी एकच भक्कम उमेदवार देवुन निवडणुक लढायची असा सूर समाज बांधावा कडून निघाला. या सभेत कोळी जमात तसेच अन्य 33 वंचित समाज मिळून लोकराज्य पार्टीची स्थापना करण्यात आली. कोळी समाज समृध्द करण्यासाठी इतर पक्षाचा त्याग करून लोकराज्य पार्टी पक्षात सदिच्छा सामिल व्हावे आणि समाजाप्रति प्रेमभावना दाखवावी. आपला हक्काचा पक्ष असल्यामुळे लोकराज्य पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते सखाराम बिऱ्हाडे यांना मिळाला आहे. कोळी समाज विखुरला गेला आहे.आता तो एकनिष्ठ, एकजूट होऊन लोकसभा लढवेल असे मत डॉ.राजेंद्र सावळे यांनी व्यक्त केले....

   नंदुरबार येथील युवा नेते दादा कोळी यांनी सांगितले कोळी समाजातील एकच उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याची ताकद समाज बांधव ठेवतो म्हणून एकच उमेदवार राहील यासाठी मी प्रयत्न करेन.. तसेच लोंढरे येथील सरपंच नितिन अखडमल यांनी आपला समाज व इतर वंचित समाजाला एकत्रित आणून प्रत्येक निवडणुकीत आपण लढायला शिकले पाहिजे. इतर सर्व वंचित जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न असावा असे मत व्यक्त केले.ज्येष्ठ नेते मनोहर वाघ, हिरा वाकडे, किशोर शिरसाठ तसेच उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले...

 समाजाचे मार्गदर्शक भास्कर कुवर यांनी सांगितले की येथे कोळी समाजासह स्थानिकांना समृद्ध करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. संविधानात असलेले कायदे, कलम ७६ वर्ष उलटून ही आम्ही वंचित आहोत. अनेक समस्या व गोष्टी पासून अनभिज्ञ आहोत. निवृत्त पोलिस अधिकारी भाऊराव बागुल यांनी सांगितले की या सर्व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आदिवासी कोळी समाज एकवटला आहे. लोकसभेच्या निवडणूक निमित्ताने आदिवासी कोळी जमाती कडून सक्षम उमेदवार देणे, मतदाता यांच्या समोर प्रचार कामी व मते मागण्यांसाठी जावे लागेल लोकसभा क्षेत्रात बुथ लावणे,पत्रके छापणे, प्रचारासाठी वाहने, रणनीती, एकमेकांना समजून घेणे, जुळवून घेणे याविषयी मार्गदर्शन केले.निष्ठावंत, कर्तव्यदक्ष निस्वार्थी विश्वासू उमेदवार उभा करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली.सभेत भारती कुवर, सरपंच नितीन आखडमल निवृत्त पोलिस अधिकारी बी.एस.बागुल ,दादा कोळी,डॉ.राजेंद्र सावळे, वाघाडी सरपंच लोटन कोळी, लक्ष्मीकांत ईशी, किशोर कोळी, भास्कर कूवर, तऱ्हाडचे सरपंच महेश सावळे, किशोर शिरसाठ, घारू कोळी, सागर निकुंभे, अर्जुन कोळी, बबन कोळी, गोपाळ कोळी, किरण सोनवणे, गणेश कुवर, विनायक कोळी, राहुल ईशी, महेंद्र कोळी, किशोर चित्ते तसेच नंदुरबार मतदासंघांतील इच्छुक उमेदवार दिनेश सोनवणे, दीपक शिरसाठ, आनंदा कोळी, हेमंत सूर्यवंशी यांच्या सह नंदुरबार, शहादा, शिरपूर, साक्री येथील प्रमुख कार्यकर्ते तसेच शेकडो समाज बांधव उपस्थित होते..सभेसाठी शिरपुरचे कार्यकर्ते नितीन आखडमल, लोटन कोळी, किशोर कोळी, हिराभाऊ वाकडे, दिनेश सोनवणे यांनी मेहनत घेतली..सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदिवासी कोळी जमातीचे अभ्यासक मनोहर वाघ यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|