नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे
श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी श्रीराम मंदिर उत्सव समिती यांच्यामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात आले. येथील श्रीराम मंदिर चावडी चौक येथे सकाळी सात वाजता संपूर्ण शहादा शहरातील पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. सुरुवातीला अजय शर्मा यांनी हिंदू धर्माच्या आराध्य दैवत श्रीराम यांच्या विषयी माहिती दिली. एक हिंदू राष्ट्र निर्माण होण्यासाठी सर्वांनी हिंदू धर्मीय सण उत्सव एकत्रित येऊन साजरे करण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. सचिन पत्की यांनी उपस्थित भाविकांना संकल्प देऊन श्री रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसाचे सामूहिक पठण केले. श्री राम रक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा याचे महत्त्व देखील त्यांनी पटवून दिले. सामूहिक पठणानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उत्सव समितीचे अध्यक्ष बबलू अग्रवाल, पंकज सोनार हितेश सोनार मीनानाथ सोनार, सोमनाथ सोनार, सुमित सोनार ,जयेश देसाई, जयेश देसाई, भरत देसाई दिनेश नेरपगार, युग्मेश पुराणिक गौरव जोशी, अजय शर्मा , डॉ. हेमंत सोनी , ललित अग्रवाल, सचिन पत्की , अमर छाबडीया , रामचंद्र चौधरी , प्रा. डॉ. अनिल साळुंके, संजय जांभळे , हितेश सोनार, कुणाल सोनार , भरत सोनार , हरीश शहा , प्रा. गणेश सोनवणे , , समाधान पाटील , कल्पना पंड्या, अनामिका चौधरी , रोहिणी भावसार , रामचंद्र चौधरी, कुणाल सोनार, प्रा शिवाजी माळी , भरत सोनार मनोज जयस्वाल, शिवपाल जांगिड सह परिसरातील भाविक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments