साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: साक्री येथील पॅंथर आबासाहेब राजेंद्र मोरे फाउंडेशन च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) येथील पंचशीलनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच पॅंथर आबासाहेब राजेंद्र मोरे फाउंडेशन तर्फे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना आधार काठी चे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील माजी पंचायत समिती सभापती तथा माजी सरपंच नितीन साळुंखे, सरपंच सुरेखा साळुंके,उपसरपंच केतन साळुंखे, माजी सरपंच चित्राताई नांद्रे, प्रतिभा साळुंके,डॉ.अनिल नांद्रे ,डॉ. वैभव साळुंखे अडव्होकेट मोहन साळुंखे ,प्रदीप नांद्रे, दिपक साळुंखे, माधवराव नांद्रे,मच्छिंद्र गायकवाड, नामदेवराव साळुंके, पंडीत साळुंके, फिरोज शहा, उत्तम माळचे,सुपडु माळचे, यादवराव वाघ ,माधवराव वाघ, लखन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते हर्षद मोरे, शरद मोरे आदी सह समाज बांधवांनी केले होते.
0 Comments