नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी कु.पर्वणी शशिकांत पाटील हिची नवोदय विद्यालय साठी निवड करण्यात आलेली असून तिचे कौतुक केले जात आहे. जवाहर नवोदय विद्यालयासाठी परीक्षा घेण्यात आलेली होती त्यात उत्तम गुणांनी तिने यश मिळवल्याबद्दल अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील नवोदय विद्यालयात तिची निवड झाली आहे.तिने आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांना दिले आहे. तिच्या या निवडीबद्दल प्राचार्य डॉक्टर फादर थॉमस प्रकाश सावळे यांनी कौतुक केले असून कु.पर्वणी पाटील ही शिक्षक शशिकांत पाटील यांची मुलगी आहे.
0 Comments