Header Ads Widget


संकल्प ग्रुपच्या वतीने नगरपालिका समोरील चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथे संकल्प ग्रुप तर्फे श्रीराम नवमी निमित्त दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता नगरपालिका समोरील चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे रक्तदान शिबिराचे उद्घाटन आदर्श निर्माण करणारे उदाहरण होते.संकल्प ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मातोश्रींच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्यामुळे संकल्प ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक केले जात आहे.प्रथम प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद होता.रक्तदान शिबिराच्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्याचे नेते अजय शर्मा शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील क्षत्रिय मराठा महासंघाचे श्याम जाधव भोई समाजाचे नेते सुपडू खेडकर ललित अग्रवाल यांच्या समावेश होता दरम्यान दिवसभर अनेक मान्यवर विविध सामाजिक कार्यकर्ते संघटनांचे पदाधिकारी रक्तदान शिबिराच्या ठिकाणी भेटी देत होते. रक्तदान शिबिरासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड बँक रक्तपेढी यांचे सहकार्य मिळाले.तर रक्तदान शिबिरासाठी संकल्प ग्रुपच्या सर्व सदस्यांनी योगदान दिले.रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आली.महिलांना सामाजिक क्षेत्रात सेवाभावी संघटनांमध्ये स्थान दिले गेले पाहिजे.सध्या महिला अनेक क्षेत्रात चांगले कार्य करीत असून देशासाठी योगदान देत असल्याने महिलांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले पाहिजे हे ध्येय होते.शहरातील नागरिकांनी व राम भक्तांनी रक्तदान शिबिरात चांगली योगदान देऊन राष्ट्रीय कार्याला सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

|