Header Ads Widget


तळोद्यात २ दुकानदारांकडून ९४ हजारांचा गुटखा पानमसाला जप्त..

प्रतिनिधी/तळोदा : तळोदा शहरातील दोन दुकानांवर धाड टाकून पोलिसांनी ९४ हजार १८ रुपयांचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तळोदा शहरात नगरपालिके समोर असलेल्या तेजस दिनेश राठोड यांच्या माँ दुर्गा किराणा दुकानावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत २८०६ रुपयांचे वि-१ तंबाखूचे ९३ पाऊच, १८५० रुपयांचे विमल पान मसाल्याचे ६१ पाऊच, १२०० रुपयांचे सुगंधित पान मसाल्याचे १० पाऊच, ३०० रुपयांचे जाफराने जर्दा तंबाखूचे एकूण १० पाऊच, १९२० रुपयांचे करमचंद प्रीमियम पान मसाल्याचे १२ पाऊच, २४० रुपयांचे केसी १०००० जाफराणी जांचे १२ पाऊच, १३५० रुपयांचे पृथ्वी कंपनी तंबाखूचे २७ पाऊच, १८०० रुपयांचे मिरज कंपनीची तंबाखूचे ४१ पाऊच, ३६०८ रुपयांचे ५५ पाऊच, ६२४ रुपयांचे झेन हिरो तंबाखूचे १६ पाऊच, १२०० रुपयांचे युवा गोल्ड ३५ तंबाखूचे ३० पाऊच, १०८० रुपयांचे सागर शक्ती तंबाखूचे १० पत्रटी टीन, २७०० रुपयांचे बागवान तंबाखू १३८ चे ९ पत्रटी टिन,११०० रुपयांचे प्रतिभा तंबाखू ५५ नावाचे २४ पत्रटी टिन, ३५२८ रुपांचे मजा तंबाखू ५५ नावाचे २४ पत्रटी डबे, २६०० रुपयांचे तानसेन ब्यू पान मसाल्याचे एकूण १३ प्लास्टिकचे लहान डबे, ६५० रुपयांचे टीओ प्रीमियम जर्दाचे एकूण १३ पाऊच, ८४० रुपयांचे ७ पाऊच, २१० रुपयांचे झटपट तंबाखूचे ७ पाऊच, ३३० रुपयांचे झेन मजा १०८ नावाचे ३० लहान पुड्यांची लट असा एकूण ४३ हजार ९२० रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. तळोदा पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (आय) २७(३), (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी कारवाई तळोदा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात साहिद मजीद अन्सारी यांच्या पीठ गिरणीत करण्यात आली. या कारवाईत १४ हजार ५१६ रुपयांचे विमल पान मसाल्याचे १६६ पाऊच, १० हजार ३१२ रुपयांचे १ तंबाखूचे एकुण ३२३ पाऊच, १०८० रुपयांचे झटपट पान मसाल्याचे ०९ पाऊच, २७० रुपयांचे झटपट तंबाखूचे ०९ पाऊच, ७२० रुपयांचे राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे एकूण ०६ पाऊच, १८० रुपयांचे झेडएल ०१ जाफरानी जर्दा तंबाखूचे०६ पाऊच, २४०० रुपयांचे तानसेन मसाल्याचे एकूण १२ पाऊच, ६०० रुपयांचे टीओ प्रीमियम जर्दा नावाचे एकूण १२ पाऊच, १०२० रुपयांचे झेन मजा १०८ नावाचे ३४ लहान पुड्यांची लट असा एकूण ५० हजार ०९८ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२८, २७२, २७३ सह अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२), (क), २७ (३), (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|