Header Ads Widget


नवापूर पोलिसांची कारवाई;धुळे-नंदुरबार जिल्हा सीमेवर चार किलो गांजा पकडले;आठ जणांविरोधात गुन्हा दाखल..

नवापूर/प्रतिनिधी नवापूर तालुक्यातील बोरझर गावाच्या शिवारातील सीमा तपासणी नाका येथे १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास नाकाबंदी सुरु असताना पोलिसांनी ५५ हजार ९५८ रुपये किंमतीचा सुका गांजा जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, अरुण स्वरुपसिंग राठोड (२९) रा. कोकणगांव ता.साक्री, रामेश्वर जोरसिंग राठोड उर्फ नाईक रा. कोकणगांव ता. साक्री, कार्तिक गायकवाड रा. सेधवड, ता. साक्री यांचा भागीदारीमध्ये सुका गांजा (अंमलीपदार्थ) अवैधरित्या विक्री करण्याचा व्यवसाय आहे. या तिघांसह कार्तिक गायकवाड रा. सेधवड ता. साक्री, फईम रईस शेख (२६) रा. मेमनगल्ली जामा मशिदचेजवळ, अंतापूर ता. सटाणा, धनलाल राजाराम चौधरी (३२) रा. पारगाव ता. साक्री हे संगनमत करुन मोटरसायकलने (एमएच १८-सीके १२३२) नवापूर येथे पिंपळनेर चौफुलीवर आले.याठिकाणी भिकु बजारा उर्फ नाईक रा. रुमकी तलाव, ता. निझर, जि. वापी, गुजरात, राधा भिकु बजारा उर्फ नाईक रा. रुमकी तलाव, ता. निझर यांच्याकडून ५५ हजार ९५८ रुपयांचा ३ किलो ९९७ ग्रॅम सुका गांजा खरेदी केला. यानंतर प्रविण अनिल नरभरवर रा. कोठडा, ता. जि. नंदुरबार याच्या मध्यस्थीने पिंपळनेर चौफुली येथे कापडी पिशवीत गांजा घेवून आले. फईम शेख व धनलाल चौधरी यांच्याशी संगनमत करून सुका गांजा कापडी पिशवीत वाहनामध्ये ठेवला. यावेळी बेकायदेशिरपणे गांजाची वाहतूक करत असतांना अरुण राठोड, फईम शेख, धनलाल चौधरी हे तिघे नाकाबंदीत आढळून आले. पोलिसांनी वाहन जप्त केल्यानंतर पाठी मागून मोटरसायकलीवर येणारा कार्तिक गायकवाड हा नाकाबंदीच्या ठिकाणी ५० मीटर अंतरावर मोटार सायकल सोडून पसार झाला. पोलिसांनी महिंद्रा कंपनीची पिकअप बोलेरो गाडी(एमएच ४१, जी १९४०), ९० हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर मोटार सायकल यासह ५५ हजार ९५८ रुपये किंमतीचा ३ किलो ९९७ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण ६ लाख ४५ हजार ९५८ रुपयेकिंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ८ जणांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात २०२४ गुंगीकारक, औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), (२) (क), २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नरेंद्र साबळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|