नंदुरबार/प्रतिनीधी:गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून गुजरात राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर नवापूर येथे सीमा तपासणी नाका उभारण्यात आला असून यासाठी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचां भंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने वाहनांची तपासणी करण्यात येत असून सीमा तपासणी नाक्यावर होणारी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी काही वाहने सिमा तपासणी नाका टाळून बायपास मार्गाने वाहतूक करत असल्यामुळे, अशा वाहनांची विशेष तपासणी परिवहन विभागाकडून करण्यात येत असून 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत 17 दोषी वाहनांवर दंडात्मक कार्यवाई करण्यात आली आहे. यावाहनांकडून एकूण 7 लाख 250 रूपये शुल्क वसुल करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने ओव्हरलोड वाहतूककरणे, परवाना वैध नसणे, वाहनाचा विमा मुदतीत नसणे, रिफ्लेक्टर नसणे, खाजगी बस मधुन जादा प्रवासीवाहतुक करणे, प्रवासी वाहनातून माल वाहतूक करणे, परवाना अटींचे उल्लंघन करणे इत्मादी गुन्हांचा समावेश आहे.ही कारवाई सीमा तपासणी नाका नवापूर येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षक रविंद्र देवरे, हरेश्वर पोतदार, सचिन दळवी, अनूज भामरे, रविंद्र बंदरकर, प्रविण महाले, गणेश पिंगळे, मनिषा चौधरी, राहूल जाधव यांनी केली असून पुढील काळातही अशा वाहनांवर कार्यवाई करण्यात येणार असल्याचेही बिडकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments