नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी सहकारी व कार्यकर्त्यांच्या बोलावलेल्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ऍड.गोवाल पाडवी यांच्या पाठीशी एकमताने उभे राहावे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने तीच भावना जाहीर रित्या दोन्ही दादांनी व्यक्त करुन येणाऱ्या काळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात परिवर्तन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. येथील प्रेस मारुती मैदानावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावळ व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील या दोन्ही दादांचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी शहाद्याचे माजी उपनगराध्यक्ष जहीर भाई शेख, भाजपचे डॉ. विशाल वळवी, पंचायत समितीच्या माजी सभापती वनिता पटले, सारंगखेड्याचे सरपंच पंकज रावल, साहेबरावगिर गोसावी, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या सदस्यांसह विविध गावातील सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाले त्यात विद्यमान खासदारांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली जिल्ह्यातील व परिसरातील समस्या मांडल्या अनेक समस्या आजही सुटल्या नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी जहीर शेख, वनिता पटले, मनलेश जयस्वाल , डॉ विशाल वळवी आदींसह विविध सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी खासदारां विषयी रोष व्यक्त करत शेतकरी, शेतमजूर ,महागाई आदी मुद्दे मांडत राज्यघटना अबाधित राहावी यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन केले.
यावेळी जयपालसिंह रावल म्हणाले की,काहींनी तालुक्यात संभ्रम निर्माण निर्माण केला. कार्यकर्ते जिवंत ठेवण्यासाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. विरोधकानां माहिती नाही आमची ताकद काय आहे. अनेक कार्यकर्त्यांनी खरी परिस्थिती सांगितली. भावना व्यक्त केल्या. तुम्ही सांगणार तेच आम्ही करणार. मतदान कोणाला करावे व प्रचार कोणाचा करावा असा प्रश्न रावल यांनी उपस्थित केल्यावर उपस्थितांनी एकमुखाने हात उंचावत सर्वांनी पंजा सांगितले. त्यामुळे आता कामाला लागण्याचा सल्ला दिला. नेत्यांना कार्यकर्ते पेक्षा पैसा मोठा आहे हे सांगणारे ठेकेदार भेटले. त्यामुळे त्यांची दिशा भरकटली. जिल्ह्यात कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असेल तर त्यांना मानसन्मान दिला गेला पाहिजे. पैसे कमविण्यासाठी ठेकेदार यांनी बाजार मांडला सरपंचांना सन्मान नाही, ही निवडणूक पक्षाची नाही. जिल्ह्यातील ठेकेदारी नष्ट करायची असेल तर जागृत राहिले पाहिजे. कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने मनापासून काम केले पाहिजे. सामान्य मतदार विकला जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे पैसा समोर झुकू नका. दबावाला बळी न पडता मतदान करण्याचे सांगण्यात आले.
अभिजित पाटील म्हणाले की, सर्वसामान्य कार्यकर्ते उपस्थित सर्व राजकीय व्यक्तीनी आपआपल्याला पध्दतीने भूमिका जाहीर केली. जिल्ह्यातील सर्व सत्ता एकाच घरात गेली. त्यामुळे नेत्यांनी सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष केले. नेत्यांना आम्ही दोघे संपलेले लोक आहेत असे वाटते. परंतु आता खरी ताकद दाखवून देणे गरजेचे आहे. आमचे समर्थक सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आहेत विचार मंथन करतांना लोकांना प्रश्न विचारला असता शेतकरी म्हटला ऊसाचे, कापसाचे आंदोलन केले तेव्हा सत्ताधारी उभे राहिले नाही. आम्ही मतदान करणार नाही. गेल्या दहा वर्षांपासून सांगतायेत उपसा सिंचन योजना सुरू करू परंतु त्या सुरू झाल्या नाही. आदिवासी जनता म्हणते मणिपूर चा किस्सा सांगत आम्ही आमचा खासदारांनी या विषयी भूमिका मांडली नसल्याने आम्ही भाजपला मतदान करू शकत नाही. शहरातील जनतेला विचारले दोंडाईचा रस्त्यासाठी आंदोलन केले परंतु खासदारांनी दखल घेतली नाही. सारंगखेडा पूल बंद होता. सध्या डामरखेडा पूल बंद आहे. रस्ते गडकरी, मोदींनी केले स्थानिक खासदार श्रेय घेत आहेत. धर्माचा नावावर झेंडे हाती घेतले. परंतु पोलीस कारवाई नंतर खासदार मदतीला आले नाहीत. इथल्या लोकांचा भावना आम्हाला कळतात. परिसरातील सर्वसामान्य जनतेने ठरवले डॉ. हिना गावित यांना मतदान करायचे नाही. ऍड.गोवाल पाडवी यांना मतदान करणे सक्षम पर्याय आहे. विद्यमान खासदारांची १०वर्षाची कारकीर्द बघून आता मतदान करणार नाही. आमचे भाजप व नरेंद्र मोदी यांच्याशी वैर नाही. आम्हाला फक्त जिल्ह्यातील जनतेवर प्रेम आहे.पक्षाच्या अनेक कार्यकर्त्याना उमेदवार मान्य नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे तर प्रास्ताविक माधव पाटील यांनी केले.
0 Comments