Header Ads Widget


वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न...

 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, प्रमुख अतिथी सीडीएससीओ, सीपोर्ट, चेन्नई, आरोग्य सेवा महासंचालनालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारचे सहाय्यक औषध नियंत्रक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन जाधव, आरअँडडी, एनडीडीएस भारत सिरम अँड वॅक्सिनेशन लिमिटेड पुणे चे सहाय्यक उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ सुनिल पांडे, मंडळाचे संचालक रमाकांत पाटील, संचालक ॲड. राजेश कुलकर्णी, संचालक दीपक पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, डॉ निलेश पाटील, सौ. श्वेतांबरी जाधव, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, प्राचार्य डॉ एन.जे. पाटील, प्राचार्य प्रा.बी.के.सोनी, प्राचार्य आर. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांनी सर्वांचा आदर मान सन्मान करणे आवश्यक असून औषधनिर्माणशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना खूप चांगले भविष्य असून व्यवस्थितरित्या अभ्यासक्रम पूर्ण करून आपण आपले जीवन चांगले बनवू शकतात. तसेच विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या अभ्यास करून शिक्षण पूर्ण करून शिक्षक म्हणून कार्य करू शकतात त्याचप्रमाणे शिक्षण घेत असतांना इतर जसे की, कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम ह्या मध्ये भाग घेऊन कला कौशल्य दाखवू शकतात. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आपला शारीरिक, मानसिक व भावनिक असा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध कला, क्रीडा व इतर स्पर्धा व नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन होत असते, त्यात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला पाहिजे कारण यामध्ये आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करता येते व स्पर्धांमध्ये यश मिळत असते, अशा यशस्वी विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हे प्रेरणादायी असतात. महाविद्यालयीन जीवनात मिळणारे पुरस्कार हे आजन्म लक्षात राहतात व हेच आपल्या यशाला प्रेरक ठरत असतात. त्यामुळे विविध स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे हा गरजेचे आहे, यश अपयश हा स्पर्धेचा एक भाग आहे विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा जोमाने तयारी करावी. परिस्थिती कितीही हलाखीची असली तरीही यशाला गवसणी घालता येते असे मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी केले. त्यानंतर क्रीडा विभागप्रमुख प्रा.हितेंद्र चौधरी, प्रा.चेतन पाटील यांनी क्रीडा विभागाचा अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.दिवाकर पाटील यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments

|