Header Ads Widget


गजानन महाराज मंदिराच्या आवारात माहेश्वरी जेष्ठ महिला मंडळ माहेश्वरी समाज मंडळामार्फत भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह 18 एप्रिल पासून सुरू ..



 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे भागवत कथा श्रवण करणारे श्रुती चकोर तर भागवत कथा चित्त , शांत आहे. कथा व श्रुती घेऊन चित चकोर होते. परमार्थासाठी कुठलाही फॉर्मुला नाही परमेश्वर मिळवण्यासाठी भगवंत मिळवण्यासाठी कुठलाही फॉर्मुला नाही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अनुभव हा वेगवेगळा असतो गजानन महाराज मंदिराच्या आवारात सुरू असलेल्या भागवत कथा ज्ञान सप्ताहात ह भ प खगेंद्र महाराज बोलत होते. गजानन महाराज मंदिराच्या आवारात माहेश्वरी जेष्ठ महिला मंडळ माहेश्वरी समाज मंडळामार्फत भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह 18 एप्रिल पासून सुरू झाला आहे. कथा आपल्याला आश्रय देण्याचे काम करते आज्ञेत राहण्याचे काम करते तसेच आराधना करायला शिकवत असते. कथा श्रवणाने आपण स्वतः कधीच भाग्यवान होत नाही किंवा पुण्यवान होत नाही. जसं सोनार बदलल्याने सोन्याची किंमत कमी होत नाही तसा कथा सांगणाऱ्या बदलला तरी कथेच्या महत्व व महात्म्य कधीच कमी होणार नाही त्यामुळे सात दिवसात एकदा तरी कथा श्रावणासाठी आपण सर्वांनी सभामंडपात जाणं गरजेचे आहे. जमीनदाराला भागवताच्या फळ मिळत पण चौकीदाराला मिळत नाही कथा श्रवण करणारे हे जमीनदार असतात तर सांगणारा हा चौकीदार असतो. भागवत हा एक रस आहे पण यात एक फरक आहे भागवत रसाचे प्राशन आपण कधीही दुसऱ्याच्या मुखातून करत असतो परंतु इतर रस हे आपल्याच मुखातून आपण करत असतो. भागवत ही तृप्त करणारी कथा आहे ज्याने भागवत कथा मनापासून एकली व आत्मसात केले तो परमार्थ साधत असतो. जे भाग्यवान आहेत त्यांच्याच घरी भागवत कथा होत असते. भागवत एक सत्य आहे. ह भ प खगेंद्र महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा सुरू असताना मधून मधून भक्ती गीत सादर केले जात असताना महिला पुरुष मंडळी त्याच्या आनंद घेत होते त्यामुळे संपूर्ण परिसर व सभा मंडप भक्तीमय वातावरणात नाहून निघाला. भागवत कथेच्या समारोप हा 25 एप्रिल रोजी होणार असून 22 एप्रिल रोजी कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे तरी सर्व भाविकांनी त्याच्या लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

|