Header Ads Widget


एकादशीच्या निमित्ताने ११० वारकऱ्यांना वारकरी सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित..

साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: साक्री तालुक्यातील भामेर येथिल विठ्ठल रुखमाई मंदीर गौशाळा ट्रस्ट व उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ यांच्या संयुक्तरितीने वारकरी सांप्रदायात योगदान दिलेल्या ११० वारकऱ्यांना वारकरी सेवा रत्न पुरस्कार व गौरवपत्र देवून सन्मानित करण्यातआले यामध्ये शेवाळी,वसमार,डोमकानी, आखाडे,भामेर,दातत्ती, विटाई, दारखेल, निजामपूर, जैताणे येथील महीला व पुरुष वारकऱ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सखाराम महाराज कजगावकर यांनी अध्यात्मिक प्रवचन दिले

तर कार्यक्रमात शेवाळी (दा.)येथील भजनी मंडळाने भजन सादर केले असता त्याला सर्व वारकऱ्यांनी साथ दिली. ११० महिला पुरुष वारकऱ्यांना ह.भ.प.शोभाताई खैरनार, ह.भ.प.चित्राताई व ह.भ.प.श्री.अनिल जगताप यांच्या हस्ते गौरवपत्र व विठ्ठल भगवान यांची ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले.या वेळी कार्यक्रमांत वारकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यातही असे उपक्रम राबवू असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.श्री.अनिल जगताप सर यांनी केले, कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यात फराळ म्हणून साबुदाणा खिचडी देण्यात आली .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ह.भ.प.श्री.अनिल जगताप सर यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

Post a Comment

0 Comments

|