Header Ads Widget


हिंदी काव्य पाठ प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे  

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचतील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी काव्य पाठ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ.एस.डी. सिंदखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ.गौतम कुवर यांनी केले. विषयतज्ञ प्राध्यापक डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी हिंदी भाषेमध्ये कविता प्रस्तुती कशा प्रकारे करावी याचे अभ्यासपूर्ण विवेचन करीत हरिवंश राय बच्चन, महादेवी वर्मा, सुमित्रानंदन पंत, मैथिलीशरण गुप्त, सुभद्रा कुमारी चौहान या प्रसिद्ध हिंदी कवींच्या कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या. कार्यशाळेच्या समारोपात नितीन कैलास चौधरी (एफवायबीए ) व उमेश छोटू महिरे (एफवायबीए) या विद्यार्थ्यांनी हरिवंश राय बच्चन यांची "जो बीत गई सो बात गई" व गोपालदास सक्सेना नीरज यांची "जीवन नही मरा करता है" ही कविता सादर केली.

एकूण 26 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला समारोपात सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमासाठी डॉ. वाय. के. शिरसाठ, डॉ. खुमानसिंग वळवी, डॉ.वजीह अशहर, डॉ. तुषार पटेल ,प्रा. एम .एफ.पठाण प्रा. नारसिंग ठाकरे ,डॉ. सुंदर पाडवी, प्रा.अन्सीलाल सुळे हे उपस्थित होते.हिंदी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील ,समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील,प्राचार्य डॉ. एम.के. पटेल यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|