Header Ads Widget


के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे 

शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथे कृषकोत्सव 2024 अंतर्गत 20 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील होते.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, मंडळाचे संचालक नुहभाई नुरानी,महाविद्यालयाचे देणगी दाते काशिनाथ पटेल, मगन पटेल,एकनाथ पटेल,विनोद पटेल (पिंपळोद),मराठी सिनेअभिनेत्री तथा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी निकिता मोरे,शुराय फाऊडेशन नाशिकचे पराग पाटील, मंडळाच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना अभिनेत्री निकिता मोरे यांनी सांगितले की,यशस्वी जीवनासाठी कष्टांना सामोरे जावे लागते.त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कठीण परिश्रम घेतले पाहिजे.पराग पाटील मनोगत व्यक्त करतांना म्हणाले,विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता विविध व्यावसायिक संधी शोधल्या पाहिजे.स्वयं रोजगार उभारून स्वतः सह समाजाची प्रगती साधली पाहिजे.
मयूरभाई पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, जीवनात यश-अपयश येत असते.अपयशाने खचून न जाता जिद्दीने आपल्या आवडीच्या क्षेत्रातील संधी शोधली पाहिजे.विद्यार्थ्यांनी ज्ञान वृध्दीसाठी जागतिक घडामोडींचा अभ्यास करून माहिती घ्यावी.  मार्गदर्शन केले.
जगदीश पाटील यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील,सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांनी केले.अहवाल वाचन विद्यार्थी प्रतिनिधी विनीत पाटील यांने केले.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सी. यू.पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.बी.सी.चौधरी यांनी मानले.यावेळी कृषकोत्सव 2024अंतर्गत विविध परीक्षा, प्रात्यक्षिक,उपक्रम,खेळ आदिंत यशस्वी व नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

|