साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: साक्री तालुक्यातील निजामपूर येथील एका शाळेत घोषणा न दिल्यामुळे एका अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यास मारहाण झाल्याची घटना घडली. गेल्या अनेक दिवसा पासून गैर प्रकार घडत असल्याचा आरोप येथील अल्पसख्यांक समाजातील मुलांनी व पालकांनी यावेळेस केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शाळेत दुसऱ्या समाजातील मुले विशिष्ठ नारे बाजी किंवा घोषणा देण्यासाठी प्रवृत्त करतात व तसे न केल्यास त्यांना माॅब लिंचीग करून बेदम मारहाण करतात अशा अनेक घटना या शाळेत होत आहे,या पूर्वी काही पालकांनी तक्रार देखील केली होती. मात्र शाळेतील संचालक ,सचिव,सर्व या घटनेला दुर्लक्ष करून असे कृत्य करण्याऱ्या काही विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे.दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य सतत सुरू आहे..विशेष म्हणजे येथील काही शिक्षक देखील विद्यार्थ्याना शिकवितांना समाजात तेढ निर्माण होईल असे वाक्य म्हणतात अशी तक्रार देखील शिक्षकांबाबत येथील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे केली आहे.असाच प्रकार आज दि.3 एप्रिल रोजी या शाळेतील इयत्ता आठवी मध्ये शिकणारा अबूजर मोहसीन शेख नावाच्या विद्यार्थ्यासोबत घडला शाळेतील 15 ते 20 मुलांनी त्यास अडवून त्याला बळजबरीने काही घोषणा देण्यास सांगितले असता अबूजर ने नकार दिला त्या वेळी त्या मुलांनी त्यास बेदम मारहाण केली अबुजर ने याची तक्रार शिक्षकांना केली असता त्यांनी नंतर बघु असे उत्तर दिले त्या नंतर त्याने घरी येऊन घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला यावरून पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्या वेळी पोलीस स्टेशनला सपोनि गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक लांडगे, शालेय समितीचे चेरमन अजितभाई शाह, गावीत सर, जगताप सर, यसूफ सय्यद, ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक लांडगे यांनी ग्रामस्थांना आश्वाशीत केले की, असे प्रकार करणांऱ्या वरती नक्की कारवाई करू व जे शिक्षक गैरसमज चे शिक्षण विद्यार्थ्यांना देतील त्यांच्या वरती देखील कारवाई करू. पुढे पोलीस प्रशासन व शाळा प्रशासन काय कारवाई करेल याकडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधले असून असे प्रकार जर या पुढेही सुरू राहिले तर शाळेबद्दल लहान मुलांमध्ये भीती चे वातावरण निर्माण होईल व दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कठोर कार्यवाही करावी अशी अपेक्षा निजामपूरकर जनता करीत आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments