नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे
पाडळदा तालुका शहादा येथे जिल्हा परिषद केंद्र शाळा तर्फे केंद्रप्रमुख रवींद्र लामगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती सप्ताह निमित्त गावातून विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी वल्लभ विद्यामंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पाटील पर्यवेक्षक अंबालाल चौधरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सह शिक्षक उपस्थित होते.सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणूक संदर्भात मतदानाची टक्केवारी वाढवावी मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे आवश्यक आहे त्या आधारावर शासनामार्फत विविध उपक्रम राबवली जात आहे त्याच्या एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.विद्यार्थ्यांनी हातात विविध फलक धरलेले होते.मतदानाबाबत घोषवाक्य होते. मतदार जनजागृती सप्ताहात विविध विद्यालये प्राथमिक शाळांमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केले जाणार आहेत.शिक्षकांचा देखील सहभाग नोंदविला जाणार आहे.गावातून प्रभात फेरी काढणे याला प्राधान्य दिले जाणार अशी माहिती केंद्रप्रमुख रवींद्र लामगे यांनी दिली.
0 Comments