शहादा प्रतिनिधी/अल्ताफ शेख:शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याची कारवाई शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी वाहनासह पाच लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईतून ताब्यात घेतला आहे.खेडदिगर भागातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन मोरे यांना मिळाली होती. यातून पोलिस निरीक्षक मोरे यांनी खेडदिगर गावाजवळील नाकाबंदी करून पथकामार्फत वाहनांची तपासणी सुरू केली होती. तपासणीदरम्यान एमएच १८ व्ही ७७७ हे वाहन नाकाबंदीत न थांबता सुसाट निघून गेले होते. चालकाला थांबण्याची सूचना करूनही तो न थांबल्याने पोलिसांनी पाठलाग करून खेडदिगर गावात वाहन थांबवून वाहनचालकाला ताब्यात घेतले.सीमेवरील अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सीमेवरून अवैध मद्य, गुटखा तसेच अंमली पदार्थाच्या पोलिसांची नजर आहे. याठिकाणी महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर म्हसावद पोलिस ठाणे हद्दीत ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. यातून गेल्या १० दिवसांत दारु, गुटखा आदी अवैध मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यातून १ लाख ९ हजार ४४० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ४ लाख ५० हजार रुपयांचे वाहन आणि १ लाखांचा मद्यसाठा असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ताब्यात घेतलेल्या चालकाविरोधात रविवारी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सरु होते.जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राजन मोरे, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील पाडवी, हेड कॉन्स्टेबल जितू पाडवी, बहादूर भिलाला, पोलिस नाईक शैलेशसिंग राजपूत, पोलिस कॉन्स्टेबल दादाभाई साबळे, उमेश पावरा, अजित गावित, राकेश पावरा यांनी ही कारवाई केली.
0 Comments